Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : कुठं स्वस्त, तर कुठं महागलं इंधन, झटपट तपासा आजचा इंधनाचा भाव

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या नरमाईचा परिणाम आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत आता जवळपास 84 डॉलरपर्यंत घसरली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत असून आज अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत. (Latest Marathi News)

हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 24 पैसे प्रति लीटर 96.66 रुपये स्वस्त विकले जात आहे, तर डिझेल 22 पैसे स्वस्त 89.54 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल (Petrol) 8 पैशांनी घसरले आणि 108.08 रुपयांवर पोहोचले. डिझेलही (Diesel) 7 पैशांनी घसरल्यानंतर 93.36 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: लक्ष्मी पूजनानिमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Weather Update : हवामानात मोठे बदल! ४ राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT