Maharashtra Bhushan Puraskar: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 13 जणांचा मृत्यू, सर्वांची ओळख पटली

Maharashtra Bhushan Award Ceremony: या सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जाणांचा मृत्यू झाला आहे. तर अत्यवस्थ असलेल्या काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra Bhushan award ceremony
Maharashtra Bhushan award ceremonysaam tv

Maharashtra Bhushan Puraskar Pradan Sohala: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटली आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जाणांचा मृत्यू झाला आहे. तर अत्यवस्थ असलेल्या काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान सर्व 13 मृतांची ओळख पटली आहे.

मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्यात अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्यने श्री सदस्य उपस्थित होते. भर उन्हात पार पडलेल्या या सोहळ्यानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात दुर्दैवाने 13 श्री सदस्य मृत्यमुखी पडले.

Maharashtra Bhushan award ceremony
Uddhav Thackeray on BJP: भाजपने शिवसेनेत गद्दारी करवली, तशीच इतरही पक्षात करत आहे; उद्धव ठाकरेंचे मोठे संकेत

मृतांमध्ये 9 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे, तर 12 व्यक्ती रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच 35 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनेतील सर्व मृतांची ओळख पटलेली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (Latest Marathi News)

1) तुळशिराम भाऊ वागड

2) जयश्री जगन्नाथ पाटील

3) महेश नारायण गायकर

4) कलावती सिध्दराम वायचाळ 5) मंजूषा कृष्णा भोंबडे

6) भीमा कृष्णा साळवी

7) सविता संजय पवार

8) स्वप्नील सदाशिव केणी

9) पुष्पा मदन गायकर

10) वंदना जगन्नाथ पाटील

11) मिनाक्षी मोहन मेस्त्री

12) गुलाब बबन पाटील

13) विनायक हळदणकर

Maharashtra Bhushan award ceremony
Rashi Bhavishya In Marathi : या राशीसाठी आजचा दिवस खास! नवी दिशा, नवा मार्ग सापडेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली. याशिवाय अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com