Uddhav Thackeray on BJP: भाजपने शिवसेनेत गद्दारी करवली, तशीच इतरही पक्षात करत आहे; उद्धव ठाकरेंचे मोठे संकेत

Uddhav Thackeray on BJP: काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Mumbai News : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठे संकेत दिले आहेत. भाजप शिवसेनेप्रमाणे महाविकास आघाडीतील इतरही पक्ष फोडू शकतो, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, देशासमोर प्रश्न मोठा आहे. नुसतं विरोधीपक्षांचं समीकरण नाही तर देशात जे काही 'मी'करण सुरु आहे त्याच्याविरोधातील हे समीकरण आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  (Political News)

Uddhav Thackeray
Political News: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, लवकरच भाजप प्रवेश

देशातील सर्व पक्ष संपतील आणि एक पक्ष शेवटी राहील असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते. हाच धोका सर्व पक्षांना आहे. ज्यापद्धतीने भाजपने शिवसेनेचा घात केला. शिवसेनेत गद्दारी करवली. अशीच कृती इतरही पक्षात करत आहेत.  (Latest News Update)

भाजपबाबत सत्ताभक्ष्यक शब्द वापरला तर वावगं ठरणार नाहीत. विरोधात कुणीही असता काय नये. देशात फक्त मीच राहिलो पाहिजे. भाजपच्या या मीपणा विरोधात विरोधकांची एकजूट झाली आहे. शिवसेना लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या ताकदीने मैदानात उतरली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Pimpri Chinchwad Hoarding Collapse: होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

द्धव ठाकरेंनी आधी दिल्लीत यावं त्यानंतर राहुल गांधी मातोश्रीवर येतील- केसी वेणुगोपाल

देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. उद्धव ठाकरे यांचा एक लढा सुरु आहे त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभं असल्याचं वेणुगोपाल यांनी यावेळी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी वेणुगोपाल यांचे आभार माणून देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी आधी दिल्लीत यावं त्यानंतर राहुल गांधी मातोश्रीवर येतील, असं केसी वेणुगोपाल म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com