File Photos saam tv
देश विदेश

Raipur News: पेरूच्या झाडावर चढणे जीवावर बेतले; तीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू

Raipur News: एकाच कुटुंबातील तीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे.

Vishal Gangurde

raipur news: एकाच कुटुंबातील तीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. छत्तीसगडच्या रायपूर येथे ही घटना घडली आहे. तिन्ही मुले एकमेकांची नातेवाईक आहेत. या घटनेत तिन्ही मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या चिमुकल्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

एकाच कुटुंबातील तिन्ही मुले झाडावर चढून पेरू तोडत होती. या पेरूच्या झाडाजवळ मोठी विहीर होती. पेरू तोडताना या तिघांचा तोल गेला. त्यानंतर तिघेही विहिरीत पडले. तिन्ही मुले विहिरीत पडताना त्यांच्या आजीने पाहिलं होतं. या आजीने या घटनेची माहिती कुटुंबातील सदस्यांना सांगितली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य विहिरीजवळ धावले.

कुटुंबातील सदस्यांना या तिघांना विहिरीतून बाहेर काढले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. कुटुंबातील सदस्यांनी तिघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तापस सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलला आहे. या घटनेने गावातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तिघांचा मृत्यू कसा झाला?

अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, एक आठ वर्षांची मुलगी आहे. तर तिचा एक पाच वर्षांचा भाऊ आहे. तर त्याचा चुलत भाऊ शेतात गेले होते. हे तिघेही पेरूच्या झाडावरील पेरू तोडत होते. या झाडाजवळ एक विहिर होती. त्यावेळी झाडाची फांदी तुटली. त्यामुळे हे तिघे थेट विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

SCROLL FOR NEXT