Ration Card Latest News : देशभरातील गरीब कुटुंबांच्या कल्याणासाठी सरकार अनेक योजना चालवते. यापैकी एक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (National Food Security Scheme)आहे. ज्यात रेशन कार्ड (Ration Card) धारक कुटुंबांना अन्नधान्य पुरवले जाते. यामध्ये, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत, कुटुंबातील सदस्यांच्या संख्येच्या आधारावर अत्यंत स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून दिले जाते.
मात्र आजही अनेक कुटुंबाकडे अजूनही शिधापत्रिका नाहीत आणि ते शिधापत्रिका बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हीही नवीन रेशन कार्ड बनण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. वास्तविक, रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्वीइतकी सोपी राहिली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक क्लिष्ट झाली आहे.
हे देखील पहा-
- पूर्वीपेक्षा जास्त कागदपत्रे आवश्यक
नवीन रेशन कार्ड बनवण्यापासून, कार्डचे नूतनीकरण करण्यापर्यंत किंवा त्यात नवीन सदस्याचे नाव जोडण्यापर्यंत, आता सुमारे 10 प्रकारची कागदपत्रे आवश्यक झाली आहेत. हे नवीन सॉफ्टवेअरमुळे झाले आहे, जे केंद्रीकृत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेशी संबंधित सॉफ्टवेअर केंद्र सरकारद्वारे चालवले जाते, ज्याद्वारे रेशन कार्ड बनवले जातात.
रेशनकार्ड बनवण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक -
कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
रेशन कार्ड रद्द प्रमाणपत्र (आधी रद्द केले असल्यास)
कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायाप्रत
गॅस पासबुकची छायाप्रत
संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या आधार कार्डाची छायाप्रत
जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा सदस्यांचे पॅन कार्डची प्रत
जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC) दस्तऐवजाची प्रत (लागू असल्यास)
दिव्यांग ग्राहकांसाठी अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत
जर तुम्ही मनरेगा जॉब कार्ड धारक असाल तर जॉब कार्डची फोटोकॉपी
उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत
पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, पाणी बिल, घर कर, भाडेनामा यापैकी कोणत्याही एकाची प्रत
रेशन कार्ड बनवल्यानंतर ते ऑनलाईन देणे बंधनकारक आहे, अन्यथा रेशन उपलब्ध होणार नाही.
- पूर्वीची प्रक्रिया सोपी होती
नवीन सॉफ्टवेअर/पोर्टल तयार होण्यापूर्वी रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया सोपी होती. पूर्वी फक्त कुटुंबप्रमुखाचा फोटो, ओळखपत्र, पत्ता पुरावा, उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रांची गरज होती. पण आता ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची झाली आहे. जर तुम्हालाही रेशन कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही जवळच्या ब्लॉक विकास अधिकारी / ग्रामविकास अधिकारी किंवा संबंधित इतर विभागांच्या CSC काउंटरवर अर्ज करू शकता.
- नोव्हेंबर 2021 पर्यंत अतिरिक्त रेशन उपलब्ध असेल
कोरोना महामारीच्या दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करून नोव्हेंबरपर्यंत ती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत शिधापत्रिकाधारकांना अतिरिक्त रेशन मिळेल. गरीब कुटुंबांसाठी गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करताना केंद्र सरकारने एप्रिल 2021 मध्ये ही घोषणा केली. या योजनेअंतर्गत दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य (तांदूळ/गहू) मोफत दिले जात आहे. हे मोफत अन्नधान्य रेशन कार्डवर उपलब्ध कोट्याव्यतिरिक्त आहे. ही योजना दिवाळीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.