आधार कार्डवर घर बसल्या बदला नाव, पत्ता, DOB आणि लिंग Saam Tv
देश विदेश

आधार कार्डवर घर बसल्या बदला नाव, पत्ता, DOB आणि लिंग; जाणून घ्या कसे

आधार कार्ड (Adhar Card) हे आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे.

वृत्तसंस्था

आधार कार्ड (Adhar Card) हे आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे. हा 12 अंकी ओळख क्रमांक केवळ ओळखपत्र म्हणून वापरला जात नाही तर विविध सरकारी लाभ मिळवण्यासाठी देखील आवश्यक आहे. मात्र, जर तुमचे नाव, जन्मतारीख, आधार कार्डवरील पत्ता यामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर कोणत्याही कारणास्तव तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल, तर तुम्हाला वाटेल चूक दुरुस्त करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जावे लागेल. दरम्यान, आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI कार्ड होल्डर धारकांना काही चूका ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा देत आहे. तुम्ही आधार कार्डच्या सेल्फ सर्विस पोर्टलवर नाव, पत्ता, लिंग, जन्मतारिख इद्यादी गोष्टी अपडेट करु शकता. हा मार्ग अतिशय सोपा मार्ग आहे.

UIDAI अनेकदा ट्वीटद्वारे याबाबत माहिती देते. UIDAI ने म्हटले आहे की, आधार कार्डधारक सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (एसएसयूपी) द्वारे घरात बसून आरामात आधार कार्डवरील तपशील अपडेट करू शकता. UIDAI नुसार, आधार कार्डमध्ये नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करण्यासाठी, https://ssup.uidai.gov.in/ssup/ या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडला गेलेला पाहिजे. जेव्हा तुम्ही सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलला भेट देऊन कोणत्याही बदलासाठी (नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा लिंग) विनंती करता, तेव्हा तुम्हाला मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी मिळेल. या OTP द्वारे तुम्ही हे सर्व बदल घरी बसून करू शकता. नाव, पत्ता यासारख्या माहितीतील बदलांसाठी तुम्हाला योग्य पुरावा देखील द्यावा लागेल. UIDAI ने पत्ता वैधता पत्राद्वारे पत्ता बदलण्याची सुविधा बंद केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT