Mission chandrayaan 3 Latest update  Saam TV
देश विदेश

Chandrayaan 3 Update : चंद्रावर सकाळ झाली, लँडर आणि रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होणार? ISROने ट्वीट करत दिली महत्त्वाची अपडेट

ISRO News : चंद्रावर सकाळ झाली आहे, परंतु लँडर आणि रोव्हरला अद्याप पुरेशी ऊर्जा मिळालेली नाही.

प्रविण वाकचौरे

Chandrayaan 3 Update :

चांद्रयान-3  चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज 22 सप्टेंबर 2023 ला जागे होणार की नाही याची प्रतीक्षा अवघ्या देशाला होती. मात्र तुर्तास तरी लँडर आणि रोव्हर जागे होणार नाहीत. उद्या 23 सप्टेंबर रोजी इस्रोचे शास्त्रज्ञ लँडर आणि रोव्हरला स्लीप मोडमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील.

लँडर आणि रोव्हर सध्या अॅक्टिव्ह नाहीत. चंद्रावर सकाळ झाली आहे, परंतु लँडर आणि रोव्हरला अद्याप पुरेशी ऊर्जा मिळालेली नाही. इस्रोचे शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-3 मधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करत आहेत. (Latest Marathi News)

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडमधून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इस्रोने शुक्रवारी माहिती दिली की, लँडर आणि रोव्हरकडून अद्याप कोणताही सिग्नल मिळू शकलेला नाही.

इस्रोने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून ते स्लीम मोडमधून बाहेर आले की नाही निश्चित केले जाऊ शकते. सध्या त्यांच्याकडून कोणताही सिग्नल मिळालेला नाही. संपर्क करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.

23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून भारताने इतिहास रचला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा तो पहिला देश ठरला.

इस्रोचे वैज्ञानिक नीलेश देसाई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, चंद्रावर आज (22 सप्टेंबर) सकाळ झाली आहे. यापूर्वी आमची योजना 22 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर पुन्हा सक्रिय करण्याची होती, परंतु काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. आता उद्या 23 सप्टेंबरला पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?

Garlic Water Benefits: लसणाचे पाणी ठरेल केस गळतीवर रामबाण उपाय

Vinod Tawde: विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई; पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

Solkadhi Recipe: सोलकढी कशी बनवावी? संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स

Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT