Chandrayaan-3 Update  Saam TV
देश विदेश

Chandrayaan-3 Update : चांद्रयान- 3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

ISRO Chandrayaan-3 Update : लँडिंग करण्यापूर्वी, मॉड्यूलला अंतर्गत तपासणी करावी लागेल आणि नियुक्त केलेल्या लँडिंग साईटवर सूर्योदयाची प्रतीक्षा करावी लागेल.

साम टिव्ही ब्युरो

Moon Photos By Chandrayaan-3 :

अवघ्या जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ कडे लागलं आहे. चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किमी दूर आहे. विक्रम लँडर रविवारी पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान चंद्राच्या जवळ पोहोचले. आता विक्रम लँडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतररावर आहे. यापूर्वी ते 113 किमी x 157 किमीच्या कक्षेत होते.

दुसऱ्या डिबूस्टिंग ऑपरेशनने कक्षा 25 किमी x 134 किमी इतकी कमी केली आहे म्हणजेच आता चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडरचे अंतर फक्त 25 किमी बाकी आहे. लँडिंग करण्यापूर्वी, मॉड्यूलला अंतर्गत तपासणी करावी लागेल आणि नियुक्त केलेल्या लँडिंग साईटवर सूर्योदयाची प्रतीक्षा करावी लागेल.

चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी, चांद्रयान-3 च्या लँडरचा वेग कमी करणे सर्वात महत्वाचे आहे. लँडिंग मिशनमध्ये हे सर्वात मोठे आव्हान आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी डिबूस्टिंगची पहिली प्रक्रिया करण्यात आली होती.  

रविवारी झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या डिबूस्टिंगबद्दल  इस्रोने सांगितले की, ऑपरेशन यशस्वी झाले आणि विक्रम लँडरने कक्षा 25 किमी x 134 किमी कमी केली आहे. सॉफ्ट लँडिंगसाठी पॉवर्ड डिसेंट 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.45 वाजता सुरू होण्याची अपेक्षा आहे.

विक्रम सध्या चंद्राच्या अशा कक्षेत आहे, जिथे चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू 25 किमी आहे आणि सर्वात दूर 134 किमी आहे. या कक्षेतून बुधवारी 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. आतापर्यंत कोणतीही मोहीम दक्षिण ध्रुवावर पोहोचलेली नाही. यामुळेच इस्रोने चांद्रयान येथे पाठवले आहे. (Latest Marathi News)

चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर भारत हे यश मिळवणारा जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीन हेच देश चंद्रवर पोहचू शकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT