Chandrayaan 3 Saam Tv
देश विदेश

Chandrayaan 3: 'इस्त्रो'ने करुन दाखवलं! चांद्रयान ३ चे प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीवर परतले

Chandrayaan 3 Succesful: इस्रोने चंद्राभोवती फिरणाऱ्या आपल्या प्रोपल्शन मॉड्युलला पुन्हा पृथ्वीवर यशस्वीरित्या आणलं आहे. इस्रोची ही कामगिरी भारताच्या भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandrayaan 3 Propulsion Module Back On Earth:

चांद्रयान - ३ मोहिमेच्या यशानंतर इस्रोचं जगभरात कौतुक झालं. चांद्रयान ३ चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन इस्रोने जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. या यशस्वी मोहिमेनंतर इथेच न थांबवा इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला आहे.

इस्रोने चंद्राभोवती फिरणाऱ्या आपल्या प्रोपल्शन मॉड्युलला पुन्हा पृथ्वीवर यशस्वीरित्या आणलं आहे. इस्रोची ही कामगिरी भारताच्या भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण इस्रो आपलं यान फक्त चंद्रावर पाठवलं नाही तर तरे यशस्वीरित्या पृथ्वीवर आणून दाखवलं आहे.

इस्त्रोला चांद्रयान ३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात यश आले आहे. प्रोपल्शन मॉड्यूल ३ महिने चंद्रावर होते. त्यानंतर १० नोव्हेबरनंतर प्रोपल्शन मॉड्यूलचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. २२ नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या जवळून गेले. चंद्राभोवती फिरणारे चांद्रयान ३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आले आहे, याबाबतची माहिती वृत्तसंस्था ANI ने दिली आहे.

चांद्रयान ३ यशस्वी मोहिम

चांद्रयान ३ने आकाशात यशस्वीरित्या झेप घेत चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर यशस्वीरित्या लँड झाले होते. इस्त्रोचे हे खूप मोठे यश आहे. इस्त्रोने पोठवलेले प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या १५० किमी कक्षेत फिरत होते. त्यानंतर आता ते पृथ्वीच्या कक्षेत परतले आहे.

चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग करणार भारत पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर २२ ऑगस्ट रोजी चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगनंतर १४ दिवस तिथेच होते. लँडर मॉड्यूलला पृथ्वीपासून वेगळे करण्याचे काम प्रोपल्शन मॉड्यूलचे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT