Chandrayaan-3 Mission Saam Tv
देश विदेश

Chandrayaan 3 Benefits: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगने जगाला काय फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan 3 Successful Landing Benefits: चंद्रावरून sample आणणे आणि त्याचे Anaylisis करण्यात ६७ टक्के मिशन आतापर्यंत फेल ठरले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Chandrayaan 3 Landing Benefits For World:

चांद्रयान ३ लवकरच चंद्रावर अवतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाईल अशी आशा व्यक्त केली जातेय. पण चंद्रावरचं हे मिशन एवढं कठीण का आहे? भारतासह संपूर्ण जग या मिशनकडे डोळे लावून का बसलंय? चंद्रयानच्या Success मुळे NASA ला आणि संपूर्ण जगाला काय फायदा होणार आहे याबाबात सविस्तर माहिती या बातमीतून जाणून घेऊ. (Latest Marathi News)

चंद्रावर ज्या ज्या देशांनी आपले यान पाठवलेत त्यात Success Rate हा फार कमी आहे. आतापर्यंत गेलेले Moon Mission हे ६० टक्के फेल झालेत. चंद्रावरून sample आणणे आणि त्याचे Anaylisis करण्यात ६७ टक्के मिशन आतापर्यंत फेल ठरले आहेत.

चंद्रावर दोन प्रकारचे मिशन केले जातात. त्यापैकी पहिलं Impactor missions. यामध्ये Lander चंद्रावर उतरतं आणि चंद्रावरील धूळ, माती आणि दगडांचे नमुने पृथ्वीवर पाठवतात. आणि त्यांचा अभ्यास केला जातो. तर दुसरं मिशन असतं orbiter mission. या orbiter mission मध्ये यान चंद्रावर उतरत नाही. हे यान चंद्राभोवती फिरतं आणि त्यांचे फोटो काढतं. आतापर्यंत झालेल्या orbiter mission मध्ये अपयशाचे प्रमाण फक्त २४ ते ३६ टक्के आगे. पण चंद्रावर Land होऊन नमुने गोळा करणाऱ्या Impactor missions मध्ये अपयशाचं प्रमाण हे ५६ टक्के इतकंय पोहचलंय.

चांद्रयान 2 फेल झाल्यानंतर ISRO ने चांद्रयान ३ ची तयारी केली. पण चांद्रयान ३ हा चांद्रयान २ च्या अपयशावर आधारित होता. म्हणजेच चांद्रयान २ अपयशी का झालं. याचा विचार आणि त्याच्या Depth मध्ये जाऊन विश्लेषण केले गेले आणि या चुका टाळून चांद्रयान ३ ची योजना तयार झाली.

चांद्रयानाचे तीन पार्ट्स आहेत. त्यात पहिला Lander Module चंद्रावर Soft Landing करण्याची आणि तिथून Rover Deploy करणे हे या Lander Module चे काम आहे.

दुसरा पार्ट Rover आहे. Rover चंद्राचे नमुने गोळा करणार आणि त्याची माहिती परत पृथ्वीवर पाठवणार.

तिरसा पार्ट Propulution Module आहे. Rover & Lander ला Lunar च्या १०० किमीच्या भागात नेऊन सोडून देणं हे त्याचं काम.

२३, २४ ऑगस्टला हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Soft landing होईल. हे काम करणारा भारत हा पहिला देश ठरेल.

दक्षिण ध्रुवाचं महत्व

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सतत सावली असते. या भागात सूर्य किरण पोहोतच नाहीत. या भागात Moon Ice आणि पाणी मिळण्याची शक्यता सांगितली जातेय. या भागात पाणी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीये. या भागात १३ किलोमीटर पर्यंत Crater आहेत. Crater म्हणजे चंद्रावरचे खड्डे. चंद्रावर अनेक प्रकारचे धुमकेतू आदळून हे खड्डे तयार होता. या खड्ड्यांमुळे आकाशगंगेचा इतिहास शोधण्यास मदत होणार आहे.

अमेरिकेला रस का?

अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंगने सर्वात आधी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. पण तरी आता अमेरिका artemis mission मधून पुन्हा माणूस चंद्रावर पाठवणारे. अमरेकिचं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच Land करण्याचा प्लॅन आहे. यासाठी अमेरिकेला चांद्रयानाच्या डेटाची गरज आहे. अमेरिकेच्या या artemis mission चा बजेट आहे ९३ बिलियन डॉलर. अमेरिकेने यापूर्वी artemis mission 1 Launch केलं होतं. या मिशनचं काम होतं फक्त चंद्राला फेरी मारणं आणि या मिशनचं बजेट होतं 4 बिलियन डॉलर. तर दुसरीकडे भारताच्या चांद्रयान ३ चा बजेट हा फक्त ८० मिलियन डॉलर इतकं आहे.

यापूर्वी इस्राएलनेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवलं होतं पण त्यांना यात अपयश आलं. दक्षिण ध्रुवावर तापमान हे उणे २०० डीग्री असतं. या भागात मनुष्याने पाठवलेले मशीन्स खराब होतात. नुकतंच रशियानेही चंद्रावर आपलं यान पाठवलं होतं पण ते फेल झालं. अशा वेळी संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे. हे यान जेव्हा चंद्रावर यशस्वी Land होईल तेव्हा भारत आणि ISRO ने एक इतिहास रचला असेल हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT