Chandrayaan 3 Update News: चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. इस्रोने (ISRO ) ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने माहिती देताना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, चांद्रयान-3 चे पुढील ऑपरेशन 6 ऑगस्ट 2023 रोजी अंदाजे 23:00 वाजता होणार आहे.
आता 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. 1 ऑगस्टच्या सुरुवातीला, अंतराळ यानाने ट्रान्स-लूनर इंजेक्शनद्वारे (TLI) 288 किमी बाय 3.7 लाख किमीची कक्षा गाठली आणि चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यानंतर आता चांद्रयान-3 हे चंद्राभोवती एक फेरी मारेल. तसेच 6 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात येईल. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी तिसऱ्या, 14 ऑगस्टला चौथ्या आणि 16 ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल. (Latest Marathi News)
दरम्यान, चंद्रयान 3 ने 14 जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी आवकाशात झेपावलं होतं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यान प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान-३ 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरल्यानंतर त्याचं खरं काम सुरु होईल. हे यान इस्रोमध्ये बसलेल्या वैज्ञानिकांना चंद्राबद्दल माहिती पाठवेल. त्याचबरोबर पाण्याचीही माहिती समोर येणार आहे.
चांद्रयानाबद्दल माहिती
चांद्रयान-3 मोहिमेचे तीन प्रमुख मुद्दे आहेत. 'प्रपल्शन, लँडर, रोव्हर'. या मोहिमेचा एकूण खर्च 600 कोटी रुपये इतका झाला आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या विभागातील शेकडो वैज्ञानिकांनी सहभाग नोंदवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.