देशातील 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर दिल्लीला अलर्ट !
देशातील 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर दिल्लीला अलर्ट ! Saam Tv
देश विदेश

देशातील 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर दिल्लीला अलर्ट !

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Maharashtra Heavy Rain) झालेल्या विध्वंसानंतर देशाच्या इतर भागात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड-बिहारमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 26 ते 28 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब आणि पूर्व उत्तर प्रदेशात 27 आणि 28 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 27 आणि 28 जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने येत्या चोवीस तासांत उत्तर प्रदेशमधील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात 27 आणि 28 जुलै रोजी हलका पाऊस आणि गडगडाटासह पाऊस सुरूच राहील.

दिल्लीला अलर्ट

सोमवारपासून हवामानात बदल होणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. नवीन हवामान व्यवस्थेमुळे सायंकाळी दिल्लीच्या विविध भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे तापमानात लक्षणीय घट होईल. तर, मंगळवारी दिल्लीच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत राहू शकतो. यासाठी हवामान खात्याने केशरी अलर्टही जारी केला आहे.

पुढील 24 तासांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा

स्कायमेट हवामानानुसार, येत्या 24 तासांत उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, किनारी कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहारचा काही भाग, झारखंड, उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, कोकण आणि गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, सिक्कीम, मिझोरम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे आणि कोकण आणि गोवा या भागात एक किंवा दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणाच्या काही भाग, उर्वरित ओडिशा, रायलसीमा आणि लक्षद्वीप या ठिकाणी एक किंवा दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seed Effects: बडीशेप खाण्याआधी आरोग्यासंबंधित 'या' गोष्टी लक्षात घ्या

Sangli News: आंघोळीच्या साबणावरून बायकोने नवऱ्याला धुतलं, पकडीने अंगठाच फोडला; सांगलीतील धक्कादायक प्रकार

Today's Marathi News Live : चंद्रशेखर बावनकुळे घेणार राज ठाकरेंची भेट

Shashank Ketkar Video: कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात इंटरेस्ट नाही...घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन अभिनेता शशांक केतकर भडकला

Jalgaon News: जामनेरमध्ये SRPF जवानाने गोळी झाडून स्वत:ला संपवलं; घटनेनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT