PM Dhan Dhan Krishi Yojana approved — a big step by the central government to benefit 1.7 crore farmers saam tv
देश विदेश

Central Government: केंद्र सरकारचे तीन मोठे निर्णय; पीएम धन धान्य कृषी योजनेस मंजुरी, १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी नवी योजना केंद्राने सुरू केलीय. यातून कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Bharat Jadhav

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारताच्या प्रगतीला नवीन उंचीवर नेणारे अंतराळ, शेती आणि शेतकरी कल्याणाशी संबंधित निर्णय घेण्यात आले. आज झालेल्या बैठकीत पीएम धन धान्य कृषी योजनेसे मंजुरी देण्यात आलीय.

या बैठकीत पहिला आणि सर्वात चर्चेतील निर्णय शुभांशू शुक्ला यांच्या १८ दिवसांच्या आयएसएस भेटीबाबत होता. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचा दौरा अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत झाला आणि त्यांच्या यशस्वी परतीनंतर मंत्रिमंडळाने देशाच्या अंतराळ क्षमता वाढवणाऱ्या या पावलाचे कौतुक केलं. या प्रस्तावात शुभांशू शुक्ला यांचा अनुभव २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या गगनयान मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल असे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय अंतराळ व्यासपीठावर भारताचं एक मजबूत स्थान निर्माण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल मानले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला कृषी क्षेत्रातील नव्या योजनेचा. मंत्रिमंडळात पीएम धन धान्य कृषी योजनेस मंजुरी देण्यात आलीय. याचा उद्देश १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आहे. या योजनेंतर्गत डिजिटल आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १४,२३५ कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित कण्यात आलाय.

यात डिजिटल कृषी मिशन, पीक विज्ञान, पशुपालन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये असे कार्यक्रम समाविष्ट आहेत. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल. या योजनेतून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना विशेष फायदे मिळण्याची अपेक्षा आहे.

तिसरा निर्णय म्हणजे देशाच्या अंतराळ यशाला आणखी बळकटी देणे, भविष्यातील मोहिमांसाठी तांत्रिक आणि आर्थिक संसाधने वाढवण्यावर भर देणे आहे. भारताला अंतराळ महासत्ता बनण्याच्या दिशेने नेणाऱ्या गगनयान आणि इतर प्रकल्पांसाठी इस्रोला पाठिंबा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT