pan card  Saam tv
देश विदेश

पॅन कार्डच्या नियमात होणार बदल; लाखोंचा व्यवहार करणाऱ्यांनी नियम जाणून घ्या अन्यथा नुकसान होईल

pan card rules : पॅन कार्डच्या नियमात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. लाखोंचा व्यवहार करणाऱ्यांनी नियम जाणून घ्यावेत.

Vishal Gangurde

पॅन कार्ड नियमात मोठा बदल होणार

१० लाख किंवा अधिक व्यवहारासाठी पॅन कार्ड बंधनकारक असणार आहे

हॉटेल, इव्हेंट, मालमत्ता आणि विमा व्यवहारांवर परिणाम नव्या नियमामुळे होणार

पॅन कार्डच्या नियमात मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारने नवीन आयकर नियमांचा कच्चा मसुदा तयार केला आहे. कोणत्याही व्यक्तीकडून नव्या आर्थिक वर्षात १० लाख किंवा अधिक रुपयांच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य असणार आहे.

सध्या एका दिवसांत ५०००० रुपयांहून अधिक रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचं असतं. वाहन खरेदीसाठी पॅनकार्ड गरजेचं सांगण्यात आलं आहे. ५ लाखांहून अधिक किमतीच्या कार खरेदीसाठी पॅन कार्डचा नंबर सांगणे गरजेचे असणार आहे. दुचाकी खरेदीसाठी पॅन कार्ड नंबर देण्याची कोणताही नियम नाही.

पॅन कार्ड संबंधित नियमांचा हॉस्पिटलिटी आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हॉटेलमधील रेस्टॉरंटचं बिल, कन्वेशन सेंटर, बँक्वेट हॉल किंवा इव्हेंट मॅनेजमेंटची १ लाखांहून अधिक रुपयांच्या सेवेसाठी पॅन कार्ड द्यावे लागणार आहे. सध्या ही मर्यादा ५०००० रुपये करण्यात आली आहे. तर मालमत्ता खरेदी, विक्री, जॉइंट डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट १० लाख रुपये मर्यादा होती. आता २० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. विमा कंपन्यांशी संबंधित व्यवहारासाठी पॅनकार्ड गरजेचे असते. सध्या ५०००० हून अधिक किंमतीच्या व्यवहारासाठी पॅनकार्ड गरजेचे असते.

नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ सालापासून लागू होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आर्थिक मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीटीडी भागधारकांशी चर्चा करून नियमांना अंतिम रुप दिले जाईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधिसूचित करण्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

Old Pension Scheme : जुनी पेन्शन मिळत नसल्याने शिक्षक आक्रमक! सरकारला दिला थेट इशारा, आता काय होणार?

SCROLL FOR NEXT