Government makes Sanchar Saathi app compulsory on all new smartphones to boost cyber safety and prevent online fraud." saam tv
देश विदेश

Cyber Crime: सायबर क्राइमविरोधात केंद्र सरकारची अॅक्शन; नवीन अॅप लॉन्च, स्मार्टफोन अपडेटसाठी कंपन्यांना ९० दिवसांची मुदत

Central Government Action Against Cyber Crime: भारत सरकारने मोबाईल कंपन्यांना स्मार्ट फोनवर सरकारी अॅप प्री-इंस्टॉल करण्याचे आदेश दिलेत. चला जाणून घेऊया हे अॅप काय आहे, त्याचा लोकांना कसा फायदा होईल.

Bharat Jadhav

  • भारत सरकारने सर्व नवीन स्मार्टफोनमध्ये संचार साथी अॅप बंधनकारक केले.

  • हे अॅप डिलीट किंवा डिसेबल करता येणार नाही.

  • ऑनलाइन फसवणूक आणि चोरीच्या मोबाईलचा गैरवापर रोखण्याचा सरकारचा उद्देश.

केंद्र सरकारने मोबाईल सुरक्षेबाबत एक मोठे आणि कडक पाऊल उचललंय. देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारचे सायबर सेफ्टी अॅप प्री-इंस्टॉल केलेले असणे आवश्यक असणार आहे. याचाच अर्थ युजर्स हा अ‍ॅप हटवू किंवा त्यांना अन इन्स्टॉल करू शकणार नाहीत. देशातील वाढती ऑनलाइन फसवणूक, बनावट नंबर आणि चोरीच्या मोबाइल नेटवर्कचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय.

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार दूरसंचार मंत्रालयाने मोबाईल कंपन्यांना ९० दिवसांचा वेळ दिलाय. या ९० दिवसांमध्ये सरकारचे 'संचार साथी' अॅप सर्व नवीन फोनमध्ये इन्स्टॉल झाले की नाही, याची कंपन्यांना खात्री करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे वापरकर्ते हे अॅप हटवू किंवा अन इन्स्टॉल करू शकणार नाहीत. हा आदेश सध्या सार्वजनिक केलेला नाही मात्र निवडक कंपन्यांना खाजगीरित्या देण्यात आलाय.

या सरकारने ज्या कंपन्यांना आदेश पाठवलाय त्यात Apple, Samsung, Vivo, Oppo आणि Xiaomi सारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. भारतातील स्मार्टफोन विक्रीत या सर्व ब्रँडचा वाटा मोठा आहे. त्यामुळे जर हा नियम लागू झाला तर त्याचा लाखो युजर्सवर परिणाम होईल. कंपन्यांना हे अॅप नवीन फोन आणि विद्यमान डिव्हाइसेस सॉफ्टवेअर अपडेटद्वारे पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेत.

स्टोअरमध्ये किंवा गोदामात असलेल्या फोनमध्येही अपडेटद्वारे इन्स्टॉल केले जाणार आहे. याचाच अर्थ असा की भविष्यात, तुम्ही नवीन फोन खरेदी केला नसला तरीही, तुमच्या फोनमध्ये हे सरकारी अॅप आपोआप अपडेट आणि इन्स्टॉल केले जाणार आहे. हा बदल हळूहळू सर्व युजर्स पर्यंत पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT