DA Hike  SAAM TV
देश विदेश

7th Pay Commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्यात वाढ

7th Pay Commission DA hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

New Delhi News : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. जानेवारी २०२३ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआरमध्ये वाढ होणार आहे.

मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता ३८ टक्क्यांहून वाढून ४२ टक्के करण्यात आला आहे. यासोबत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरिअर देखील मिळणार आहे. या घोषणेनंतर केंद्र सरकारवर 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शधारकांना हा फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पगारानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ पगार-१८००० रुपये आहे, तर त्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के अर्थात ६,८४० रुपये इतका आहे. आता तोच महागाई भत्ता ४२ टक्के झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ७,५६० रुपये इतका झाला आहे.

कमाल मूळ वेतनाच्या बाबती बघितलं तर ५६,००० रुपयांवर महागाई भत्ता २१,२८० इतका आहे. तर आता चार टक्के महागाई भत्ता वाढल्याने आता महागाई भत्ता २३,५२० रुपये इतका होणार आहे. तर किमान वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिना ७२० रुपये मिळणार आहे, त्यामुळे त्यांना वार्षिक ८,६४० रुपये मिळणार आहे.

केंद्र सरकार वार्षिक महागाई भत्ता/डियरनेस रिलीफ हे जानेवारीच्या सुरुवातीला म्हणजेच जुलै महिन्याच्या अखेरीस वाढ करते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महागाई भत्त्यात वाढ करताना उशीर होत आहे. गेल्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे महागाई भत्ता ३४ टक्क्यांहून ३८ टक्के झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT