Two new airlines set to enter Indian skies after receiving approval from the Civil Aviation Ministry. 
देश विदेश

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

Two New Airlines: केंद्र सरकारने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी दोन नव्या एअरलाईन्सला उड्डाणाची मान्यता दिलीय. अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या दोन नवीन विमान कंपन्यांना सरकारीच मंजुरी मिळालीय.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारकडून दोन नव्या एअरलाईन्सना उड्डाणाची मंजुरी देण्यात आलीय.

  • अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला NOC प्रदान

  • हवाई प्रवासात प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार

केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना उड्डाणाची तयारी सुरू करण्याची परवानगी दिलीय. या निर्णयामुळे भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांना अधिक पर्याय मिळू शकतील. लवकरच नवीन दोन एअरलाईन्सची विमान सेवा सुरू होणार आहे. विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारतात इंडिगो विमानाच्या कारभारामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे हवाई प्रवासाची अभूतपूर्व कोंडी झाली होती. सध्या अस्तित्त्वात असलेल्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचं दिसत आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने दोन नव्या कंपन्यांना मान्यता दिलीय. अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालंय.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलीय. मागच्या आठवड्यात विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या दोन नवीन कंपन्यांच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोच्या व्यवस्थपनात विस्कळीतपणा झाल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळे संपूर्ण देशाची विमानसेवांवर परिणाम झाला होता. हजारो प्रवाशांना तासन्‌तास विमानतळांवर थांबावे लागले होते. या घटनेमुळे भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व असणं धोकादायक ठरू शकते, यामुळे या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

केरळमधील अलहिंद समूहाकडून अल हिंद एअर ही कंपनी हाताळली जातेय. अलहिंद ही पूर्वीपासूनच ट्रॅव्हल आणि इतर संबंधित क्षेत्रात कार्यरत आहे. तर फ्लाय एक्सप्रेस ही कंपनी हैदराबादमध्ये स्थित असून या कंपनीला कुरिअर आणि कार्गो सेवांचा अनुभव आहे. याशिवाय शंख एअर कंपनीला आधीच ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे. २०२६ पासून या कंपनीच्या विमानांचे उड्डाण सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT