Arindam Bagchi ANI
देश विदेश

Indian Navy personnel: भारतीय माजी ८ नौदलाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केंद्राकडून आव्हान याचिका दाखल

Indian Navy personnel: कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Bharat Jadhav

Indian Navy personnel :

मध्यपूर्वेतील देश कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. या शिक्षेविरोधात केंद्र सरकारने आव्हान याचिका दाखल केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. (Latest News)

ज्या न्यायालयाने निर्णय दिलाय. तो निर्णय गृप्त आहे. निकालची प्रत विधी तज्ज्ञांना दिलीय. आम्ही या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल केली असून आम्ही कतारच्या दुतावासाच्या संपर्कात आहोत. आम्हाला आणखी एक कॉन्सुलर ऍक्सेस मिळालाय. या सर्वांच्या कुटुंबीयांच्याही आम्ही संपर्कात आहोत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू. ही संवेदनशील बाब असून यात कोणतीही अटकळ ठेवू नये,असं बागची या नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षेविषयी बोलताना म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही अनेक बाबींची माहिती दिली. सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारावर ते म्हणाले, अशा घटना पाकिस्तानकडून नेहमीच उठवल्या जातात. कारण हे शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेचा मुद्दा बीएसएफच्या फ्लँक बैठकीत उपस्थित करण्यात आला होता असं ते म्हणाले.

कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्वांवर इस्राइलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप कतारने केला होता. कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना अटक केली होती. मात्र सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला त्याच्या अटकेची माहिती दिली होती.

कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेन्दु तिवारी, कमांडर सुग्नाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल, आणि सेलर रागेश, अशी या नौदलाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांना गृप्तहेरच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

हे सर्वजण कतारमधील दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज अँड कन्सल्टन्सी या खासगी कंपनीत काम करत होते. या संस्थेचे प्रमुख ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमी हे आहेत. यांनाही ८ भारतीय नागरिकांसह अटकही करण्यात आली होती, मात्र नोव्हेंबरमध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. ग्लोबल टेक्नोलॉजीज अँड कन्सल्टन्सी कंपनी संरक्षण सेवा पुरवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT