Mahadev App  Saam Tv
देश विदेश

Booking Apps: केंद्र सरकारचा Betting APPला दणका; महादेव बुकिंग अ‍ॅपसह २२ अ‍ॅपवर बंदी

Central Government : केंद्र सरकारने महादेव बुकिंग अ‍ॅपसह २२ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

Central Government Action on Betting APPs :

केंद्र सरकारने बुकिंग अ‍ॅपवर दणका दिलाय. सरकारने महादेव बुकिंग अ‍ॅपसह २२ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केली अधिसूचनेत ही माहिती दिलीय. या अ‍ॅपच्या माध्यमातून बेकायदेशीर सट्टेबाजी होत असल्याचं ईडीने सांगत केंद्र सरकारला बंदी घालण्याबाबत सांगितल होतं. (Latest News)

अंमलबजावणी संचालनालयाने बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप सिंडिकेट आणि त्यानंतर छत्तीसगडमधील महादेव बुकिग अ‍ॅपच्या ठिकाणांवर छापे टाकली. या अ‍ॅपच्या बेकायदेशीर ऑपरेशन्सच्या विरोधात केलेल्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आलीय. छत्तीसगडमधे दोन दिवसांपूर्वी काही कोटींची रक्कम या अ‍ॅपपच्या संबंधित ठिकाणाहून जप्त केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान याप्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचाही संबंध असल्याचं ईडीने म्हटलं होतं. छत्तीसगडमधील निवडणुकीसाठी महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून पैसे पाठविले जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी असीम दासला आणि छत्तीसगड पोलीस दलातील कॉन्स्टेबल भीमसिंग यादव अटक केली. भीमसिंग यादव आणि एक असीम दास सध्या कोठडीत आहेत.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १९ अंतर्गत मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी त्यांची अटक करण्यात आलीय. दास याच्याकडून ५.३९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे छत्तीसगडमधील एका राजकीय नेत्याला निवडणुकीसाठी देण्यात येणार होते, असे त्याने ईडीच्या चौकशीत सांगितलं.

दरम्यान केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, श्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, की, छत्तीसगड सरकारला कलम ६९ अ आयटी कायद्यानुसार वेबसाइट किंवा अ‍ॅप बंद करण्याची शिफारस करण्याचे सर्व अधिकार आहेत. मात्र त्यांनी तसे केले नाही. गेल्या दीड वर्षांपासून चौकशी सुरू असतानाही राज्य सरकारने तशी विनंतीही केली नाही. ईडीकडून पहिली आणि एकमेव विनंती प्राप्त झाली आहे आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचं चंद्रशेखर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amboli Recipe: कोकणातली स्पेशल मऊ, लुसलुशीत अन् जाळीदार आंबोळी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Yoga Poses For Hunchback: पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी करा ही 5 योगासने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

Ajit Pawar Death: पुरावे असताना कारवाई का नाही? मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

SCROLL FOR NEXT