guatemala bus accident  Saam Tv News
देश विदेश

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

guatemala bus accident : मध्य अमेरिकेतील प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये भीषण अपघात

इंटर-अमेरिकन हायवेवर प्रवाशांची बस कोसळली खोल दरीत

अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

बस अपघातामुळे मध्य अमेरिकेत खळबळ

मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. ग्वाटेमालाच्या पश्चिम इंटर-अमेरिकन हायवेवर प्रवाशांची बस खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत किमान १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत.

स्थानिक अग्निशमन ब्रिगेडचे प्रवक्ते लिआंद्रो अमाडो यांनी सांगितलं की, भीषण अपघातात ११ पुरुष तर ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर एकूण १९ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

ग्वाटेमालाच्या सोलोल विभागातील महामार्गावरील १७२ आणि १७४ किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात घडला. रस्त्यावर धुक्यामुळे ही अपघाताची घटना घडली. या भागात धुक्यामुळे रस्त्यात दिसणे अवघड होऊन जाते. या भागात गाडी चालवणे धोकादायक आहे. याच भागात अपघात झाल्याची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.

अग्निशमन विभागाद्वारे सोशल मीडियाद्वारे अपघाताचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासनाने अपघात प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अपघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. वाहन काळजीपूर्वक चालवावी , अशी सूचना देखील वाहनधारकांना केल्या आहेत.

अपघाताची भीषण घटना कुठे घडली? 

मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये पश्चिम इंटर-अमेरिकन महामार्गावर अपघाताची घटना घडली.

बस अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

बस अपघातात कमीत कमी 15 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साह

Bigg Boss Marathi 6 : शेरास सव्वाशेर! संस्कृतीचा हलगर्जीपणा तिला पडला महागात; विशालने चलाखीने Power Key मिळवली, VIDEO

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं निधन; अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Holi 2026: होळी खेळताना मोबाईल फोनची काळजी कशी घ्याल?

LIC Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT