सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board Of Secondary Education)नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून ९ वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये ओपन बुक टेस्ट (Open Book Test) घेण्याचा विचार करत आहे. केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळ हा नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. (Latest News)
रिपोर्टनुसार, सीबीएसई बोर्डाच्या काही निवडक शाळांमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ओपन बुक टेस्ट देता येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी ओपन बुक टेस्ट घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि जीवशास्त्र विषयांसाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे.
रिपोर्टनुसार, नोव्हेंबर- डिसेंबर या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांमध्ये ओपन बुक टेस्ट घेण्यात येणार आहे. याबाबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीएसईच्या अभ्यासक्रम समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
सीबीएसई बोर्डाने २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक टेस्ट राबवली होती. परंतु याचा चांगला फायदा न मिळाल्याने ही पद्धत बंद करण्यात आली होती.
ओपन बुक टेस्ट म्हणजे नक्की काय?
ओपन बुक टेस्ट हा एक नवीन प्रयोग आहे. यामध्ये काही विषयांचे परिक्षा घेतली जाते. त्यातील प्रश्न अवघड असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा अभ्यासाचे इतर साहित्य घेऊन बसण्याची परवानगी असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.