arvind kejriwal  saam tv
देश विदेश

CBI Summons Arvind Kejriwal : मोठी बातमी! CBI करणार अरविंद केजरीवाल यांची चौकशी, १६ एप्रिलला बोलावले

Nandkumar Joshi

jeuCBI Summons Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणाची चौकशी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

या प्रकरणात सीबीआयने आता आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले आहे. १६ एप्रिल रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. (Latest News Update)

सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्विट केले आहे. अत्याचाराचा अंत नक्कीच होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दिल्लीतील अबकारी धोरणात घोटाळा झाल्याच्या आरोपाखाली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सिसोदिया यांची तुरुंगातच ईडीनेही चौकशी केली होती.

ईडीने मनीष सिसोदिया यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती. ईडीने कोठडी घेऊन चौकशीही केली होती. सिसोदिया यांनी याच प्रकरणात राउज एव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल करून जामिनाची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला नाही.

काय आहे प्रकरण?

दिल्ली सरकारने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी नवे अबकारी धोरण लागू केले होते. दिल्ली सरकारने हे धोरण लागू केल्यानंतर महसूलात वाढ होऊन माफिया राज संपल्याचा दावा केला होता. मात्र, त्याउलट घडले. दिल्ली सरकारच्या महसूलात घट झाली.

दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी जुलै २०२२ रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना अहवाल पाठवला होता. त्यात मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य व्यावसायिकांना अतिरिक्त फायदा मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT