Cbi Raid On Cgst Officer | ₹1.86 Crore Cash, Gold And Foreign Currency Seized saam tv
देश विदेश

नोटांचे बंडल, विदेशी चलन अन् सोन्याच्या विटा; CBIनं CGST अधीक्षकाच्या घरात टाकलेल्या धाडीत काय-काय सापडलं?

CBI Raid on CGST Superintendent Home: हरियाणातील पंचकुला येथे CGST अधीक्षकाच्या निवासस्थानी सीबीआयकडून झाडाझडतीत घेण्यात आली. यात भारतीय आणि परकीय चलन, सोन्याच्या विटा, दागिने आणि चांदी असा सुमारे 1.86 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Bharat Jadhav

  • पंचकुल्यात CGST अधीक्षकाच्या घरावर सीबीआयचा छापा

  • CGST अधिकाऱ्याच्या घरातून 1.86 कोटींचा मुद्देमाल जप्त

  • 10 लाखांची लाच घेताना CGST अधीक्षकाला अटक

हरियाणातील पंचकुला येथील सीजीएसटी अधीक्षकाच्या घरात सीबीआयला पैशांचं घबाड सापडलंय. लाचखोरीच्या एका प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकाच्या निवासस्थानी सीबीआयने केलेल्या झाडाझडतीत रोख रक्कम, परकीय चलन, सोने आणि चांदी असा एकूण सुमारे १.८६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (CBI raid on CGST superintendent's residence in Panchkula)

प्रकरण काय आहे?

हरियाणातील पंचकुला येथे, सीबीआयने सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) विभागाच्या एका अधीक्षकाच्या निवासस्थानावरून सुमारे १.८६ कोटी रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. या अधिकाऱ्याला १० लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये भारतीय आणि परकीय चलन, तसेच सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा आणि चांदीचा समावेश आहे. १९ नोव्हेंबर रोजी लाच स्वीकारत असताना सीबीआयने अधीक्षकाला आरोपीला रंगेहात पकडले होते.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आरोपी सीजीएसटी अधीक्षकाने एका खासगी कंपनीला जीएसटी प्रकरणांत लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. एका तक्रारीच्या आधारे सीबीआयने १९ नोव्हेंबर रोजी पंचकुला येथे सापळा रचला आणि आरोपीला १० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं होतं.

यानंतर २० नोव्हेंबर रोजी आरोपीच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान २४.२९ लाख रुपयांची भारतीय चलन आणि सुमारे १५.६५ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. यासह सुमारे १.४६ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा आणि चांदीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सर्व वस्तूंचे एकूण मूल्य सुमारे १.८६ कोटी रुपये असल्याचा अंदाज सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलाय.

सीबीआयच्या या छापेमारीत आरोपीच्या सहा बँक खाते, गुंतवणूक, जीवन विमा पॉलिसी आणि स्थावर संपत्तीचे कागदपत्र सापडलेत. यासह वाहन खरेदीचे कागदपत्रे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील देखील अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता, गुंतवणूक व आर्थिक व्यवहारांबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी सीबीआय या कागदपत्रांची तपासणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवई तलावावर साकारणार देशातील सर्वात भव्य म्युझिकल फाउंटन

Lemon Storage Tips: लिंबू आठवडाभर ताजे आणि टवटवीत ठेवण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Ind vs NZ : टीम इंडियानं 'करून दाखवलं'! ९४ वर्षांत पहिल्यांदाच विक्रमाला गवसणी

दिग्गज नेत्याचा भाजपला रामराम; विरोधी पक्षात केला प्रवेश, राजकारणात खळबळ

Dombivli Travel : फार दूर जाण्याची गरज नाही! डोंबिवलीपासून जवळच आहेत 'हे' ६ भन्नाट विकेंड डेस्टिनेशन्स

SCROLL FOR NEXT