Priyanka Gandhi SaamTV
देश विदेश

Case Filed Against Priyanka Gandhi: '50 टक्के कमिशन सरकार' वरून वाद, प्रियांका गांधी आणि कमलनाथ यांच्याविरोधात ४१ ठिकाणी FIR

Madhya Pradesh Election 2023: प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Ex Cm Kamalnath) यांच्याविरोधात मध्यप्रदेशात 41 हून अधिक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Priya More

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (MP Election 2023) भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. '50 टक्के कमिशन सरकार'च्या ट्विटवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींच्या (Priyanka Gandhi) अडचणी वाढू शकतात. प्रियंका गांधींच्या या आरोपावरुन भाजप आक्रमक झाला आहे. प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Ex Cm Kamalnath) यांच्याविरोधात मध्यप्रदेशात 41 हून अधिक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावरुन भाजपवर ५० टक्के कमिशनचे सरकार असा आरोप केला होता. या आरोपावरुन भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याचवेळी काँग्रेसकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशाच प्रकारचा आरोप कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भाजपावर केला होता. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेऊन काम करते, असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, 'ते प्रियंका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांविरुद्ध शेकडो एफआयआर दाखल करू शकतात. मध्य प्रदेश सरकार असो वा भाजपचे कोणतेही सरकार, भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणे ही आता केंद्र सरकार आणि भाजपची सवय झाली आहे. पण या सगळ्या गोष्टींना आपण घाबरून चालणार नाही. आम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करू. मध्य प्रदेश सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे.'

तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अरुण यादव यांनी सांगितले की, 'राज्यात ५० टक्के आयुक्तांचे सरकार कार्यरत आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवला. याबाबत त्यांनी माझ्या, प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पूर्वी आम्ही गोर्‍यांशी लढलो, आता त्यांच्याशी लढत राहू.' असं अरुण यादव यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

SCROLL FOR NEXT