Medha Patkar Saam TV
देश विदेश

मेधा पाटकर यांच्या विरोधात १७ वर्षांपूर्वीच्या संशयित व्यवहारांवरुन तक्रार दाखल

विशेष म्हणजे १७ वर्षापुर्वीच्या प्रकरणातून त्यांनाही नोटीस पाठल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असतानाच आता सामाजीक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar ED Notice) यांनाही आज ईडीची नोटीस आली आहे. विशेष म्हणजे १७ वर्षापुर्वीच्या प्रकरणातून त्यांना ही नोटीस पाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जेष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २००५ साली म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून ईडीबरोबर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि आयकर विभागातही (Income Tax) पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेधा पाटकर साम टीव्हीशी बोलताना म्हणाल्या की हे राजकीय कारस्थान आहे. ही ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. मागच्या वर्षीची रक्कम प्रिंट केली आहे आणि हे खोटे प्रकरण आहे. मी हे सर्व कागदपत्र तपासून बोलत आहे. याचा तपास जर झाला तर ईडीचं पितळ उघडं पडेल असंही मेधा पाटकर म्हणाल्या, त्याचबरोबर हे आम्हाला बदनाम करण्याचा प्रकरण असल्याचंही त्या म्हणाल्या.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, नर्मदा नवनिर्माण अभियान हे बृन्हमुंबई चॅरिटी कमिश्नर यांच्याकडे नोंदणी असलेले एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. याच एनजीओच्या बँक ऑफ इंडियाच्या 00101010006**** या अकाऊंटवर १८ जून २००५ या एका दिवशी १ कोटी, १९ लाख, २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची माहिती आहे. पण यात एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरुन ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झालेली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही रक्कम जमा करणाऱ्या एक देणगीदारांपैकी पल्लवी प्रभाकर भालेकर या त्यावेळी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT