छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली. थुंकण्यासाठी कारचा दरवाजा उघडला अन् अनर्थ घडला. १०० च्या स्पीडमध्ये असेल्या कार रस्त्यावर ६ वेळा उलटली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचालकाचा मृत्यू झाला. ही घटना विलासपूरमधील गुरूनानक ढाब्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन मित्र पार्टी करून घरी जात होते. यावेळी महामार्गावर एका छोट्याशा चुकीमध्ये भयंकर अपघात झाला. विलासपूर येथील गुरूनानक ढाब्याजवळ कारला भीषण अपघात झाला. कारमध्ये कारचालक आणि त्याचो दोन मित्र होते. कार वेगात असतानाच चालकाने गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा खोलला. यावेळी कार १०० च्या स्पीडमध्ये होती. दार खोलल्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकून सहा वेळा उलटली.
अपघातावेळी कारचालकासह कारमध्ये असलेले सर्वजण रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेले तरुण ३१ वर्षाचा असून तो कपड्याचा व्यापारी होता. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, जॅकी गेही असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जॅकी रविवारी रात्री उशिरा एका पार्टीला गेला होता आणि त्याने त्याचा मित्र आकाश चंदानीला रात्री १.३० वाजता त्याला घेण्यासाठी फोन केला. आकाश पंकज छाब्रासोबत कारमधून आला. आकाश कार चालवत होता.
पंकज पुढच्या सीटवर बसला होता आणि जॅकी मागे होता. बिलासपूर-रायपूर महामार्गावर आकाशने अचानक गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला. त्यामुळे कार अनियंत्रित झाली अन् डिव्हायडरला जाऊन धडकली आणि ६ वेळा उलटली. तिघेही कारमधून खाली पडले. या अपघातामध्ये जॅकीचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.