Car Accident Saam Tv
देश विदेश

Accident: केदारनाथला पोहचण्यापूर्वीच काळाचा घाला, कार पुलावरून कोसळली; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Uttarpradesh Car Accident: उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये भरधाव कार पुलावरून कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जिवलग मित्रांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण केदारनाथला देवदर्शनासाठी जात होते.

Priya More

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये भीषण अपघातामध्ये ४ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. १०० च्या स्पीडमध्ये असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली कोसळली. २० फूट उंचावरून ही कार थेट पाणी भरलेल्या शेतात पडली. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात छपार परिसरातील रामपूरमध्ये झाला. कारमधील सर्वजण गुजरातमधील होते. हे सर्वजण उत्तराखंडमधील केदारनाथला जात होते. कार १०० च्या स्पीडमध्ये होते. त्यावेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षण भिंत तोडून पूलावरून खाली कोसळली. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्वांना बाहेर बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी चौघांना मृत घोषीत केले तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघातामध्ये, मोहन ठाकूर, करण, अमित, विपुल यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण गुजरातच्या गांधीनगरमधील तारापूरमध्ये राहणारे होते. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पानीपत-खटीमा नॅशनल हायवेवर कारला अपघात झाला. कारमधील सर्वजण हरियाणाच्या दिशेवरून येत होते. पूलावर वळणाचा रस्ता आहे. कारचा स्पीड जास्त होता. त्यामुळे कारचालकाचा ताबा सुटला आणि कार शेतामध्ये भरलेल्या पाण्यात कोसळली. कारमध्ये असलेल्यांनी सीट बेल्ट लावले नव्हते. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला पण दरवाजे उघडत नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; शिपाई, क्लर्क ते अधिकाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT