दिलीप कांबळे, लोणावळा प्रतिनिधी
Lonavala Scorpio accident drunk driver kills one injures anotherो: णावळ्यात भरधाव स्कॉर्पियो कारने दोन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे. अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या जमावाने कारला आग लावली. भीषण आगीमध्ये चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.
लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव स्कॉर्पियो गाडीने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोघांना जोरात धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे. कार चालक हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. तुलसी राम रामपाल यादव असे स्कार्पिओ चालकाचे नाव आहे. तर आयात शेख जखमी असून कार्तिक चिंचणकर याचा जागीच मृत्यू झाला आहे.
स्कॉर्पियो चालकाने दारूच्या नशेत कट्ट्यावर गप्पा मारत बसलेल्या दोघांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की त्यामधील एकजण जोरात दूर फेकला गेला. दुसऱ्या व्यक्तीला गंभीर जखम झाली असून उपचार सुरू आहेत. अपघाता झाल्याचे समजताच आजूबाजीचे लोक संतप्त झाले. लोकांनी संतापाच्या भरात कार जाळून टाकली. अपघाताची माहिती मिलताच लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. चालकाला ताब्यात घेतलं. जखमीला जवळच्या रूग्णालयात पाठवले. दरम्यान या अपघाता नंतर अज्ञात्यांनी स्कॉर्पियो गाडीला आग लावून पेटवून दिली. लोणावळा शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.