Saam TV Breaking News Saam TV Breaking News
देश विदेश

धक्कादायक! हायस्कूलमध्ये अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यूने कॅनडा हादरले, हल्लेखोराचा जागेवरच खात्मा

Canada school shooting : कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील टम्बलर रिज येथील हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह १० जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत शूटरचा खात्मा केला आहे.

Namdeo Kumbhar

Canada British Columbia high school shooting latest updates : एका हल्लेखोराने हायस्कूलमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक कॅनडामध्ये घडली आहे. मंगळवारी एक हल्लेखोर अचानक हायस्कूलमध्ये घुसला अन् गोळीबार सुरू केला. त्यानंतर एकच गोंधळ अन् भीतीचे वातावरण निर्माण झाल. गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. पोलीस आणि हल्लेखोरामध्ये चकमक झाली. पोलिसांनी हल्लेखोराला जागेवरच ठार मारले. पण तोपर्यंत हल्लेखोराच्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला होता. कॅनडामध्ये मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत हल्लेखोरासह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कॅनडा हादरलेय. (Gunman killed after shooting at BC secondary school)

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस स्टाफ सार्जंट ख्रिस क्लार्क यांनी या भयानक हल्ल्याला दुजोरा दिलाय. कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की, ब्रिटिश कोलंबियामधील ईशान्य भागात एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीलाही ठार मारण्यात आले आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पीस परिसरातील टम्बलर रिज माध्यमिक शाळेत हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. यात ९ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोराला गोळ्या घालून ठार मारले. दरम्यान, या हल्ल्यात २५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शूटरसह १० जणांचा मृत्यू

मंगळवारी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच्या टम्बलर रिजमध्ये गोळीबारात संशयीत शूटरसोबत १० जणांचा मृत्यू झाल्याचे CBC न्यूजने सांगितले. हायस्कूलच्या आतमध्ये ६ लोकांचे मृतदेह आढलले. तर २ जण एका घरात मृत्युमुखी पडल्याचे आढळले. घरात आढळलेले मृत्यूही याच गोळीबाराशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका व्यक्तीचा मृत्यू रूग्णलयात उपचारासाठी घेऊन जाताना झाला. पोलिसांनी संशयीत हल्लेखोराचा खात्मा केला, असेही सीबीसी न्यूजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambar Vadi Recipe : खमंग सांबार वडीची पारंपरिक रेसिपी, पोटभर करा नाश्ता

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

EPFO Update: खुशखबर! PF चे पैसे UPI मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार? वाचा सविस्तर

Jui Gadkari : "रस्ते नाहीत, खूप त्रास झालाय..."; मढ आयलँडची भीषण परिस्थिती पाहून जुई गडकरी भडकली, पाहा VIDEO

Chandra Grahan: शनीच्या राशीत लागणार वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण; जाणून घ्या सूतक काळ आणि नियम

SCROLL FOR NEXT