Delhi High Court Saam TV
देश विदेश

Delhi High Court : पतीला सर्वांसमोर नपुंसक म्हणणे मानसिक क्रूरता, दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

साम टिव्ही ब्युरो

Delhi News :

घटस्फोटातील एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. नवऱ्याला सर्वांसमोर नपुंसक म्हणणे मानसिक क्रूरता असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने पतीच्या बाजूने निर्णय देत घटस्फोटाला मंजुरी देखील दिली आहे. कौटुंबिक कोर्टाने पतीची घटस्फोट याचिका फेटाळली होती.

कोर्टाने याबाबत म्हटलं की, आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की, इतरांसमोर पत्नीने पतीला उघडपणे अपमानित करणे आणि नपुंसक म्हणणे योग्य नाही. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत खासगी लैंगिक जीवनावर चर्चा करणे मानसिक क्रूरता म्हटले जाऊ शकते. न्यायमूर्ती सुरेश कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निकालात असं नमूद केल आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, या दाम्पत्याचं लग्न २०११ मध्ये झालं होतं. पत्नीला कॉम्प्लिकेशन्समुळे मुल होण्यात अडचणी येत होत्या. या सर्वासाठी पत्नी पतीला दोषी मानत होती. मात्र तरीदेखील दोघांनी IVFच्या मदतीने मुल होण्यासाठी प्रयत्न केला.

मात्र दोन वेळा IVF करूनही या जोडप्याला मूल होऊ शकलं नाही. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण होऊ लागले होते. कोणताही आधार नसताना पत्नीने आपल्याला तिचे आई-वडील, बहिणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसमोर नपुंसक म्हणत अपमान केल्याचा आरोप पतीने केला आहे.

पतीने दावा केला की, सासरच्या मंडळींकडून त्याच्यावर नपुंसकतेचे खोटे आरोप वारंवार लावले गेले. पत्नीने मात्र हे आरोप फेटाळून लावले. उलट तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा दावा तिने केला. परंतु कोर्टाला तिच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा सापडला नाही. अपीलकर्त्याचे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे कोणतेही वर्तन ती सिद्ध करू शकली नाही.

न्यायालयाने निष्कर्ष काढला की दोन अयशस्वी IVF प्रक्रियेनंतर, पत्नी असंतुष्ट झाली आणि ती तिच्या पालकांच्या घरी गेली. कोणत्याही कारणाशिवाय किंवा आधाराशिवाय वैवाहिक नातेसंबंधातून पत्नीची अशी माघार चुकीची आहे. त्यामुळे कोर्टाने पतीच्या बाजून निकाल दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT