Accident News: चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ घडला; होळीच्या दिवशीच माय-लेकींसह तिघांचा मृत्यू

Bihar Accident News: संपूर्ण देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू असताना बिहारच्या बेगुसराय येथे मात्र एक दुर्दैवी घटना घडली.
Bihar Car Accident News
Bihar Car Accident News Saam TV

Bihar Car Accident News

संपूर्ण देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू असताना बिहारच्या बेगुसराय येथे मात्र एक दुर्दैवी घटना घडली. होळीनिमित्त गावाकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत माय-लेकींसह तिघांचा जागीच मृत्यू झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bihar Car Accident News
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! अलीपूरमध्ये कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी, थरारक VIDEO

याशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ऐन होळीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्चना देवी, नम्रता कुमारी आणि काजल कुमारी अशी मृतांची नावे आहेत. (Breaking Marathi News)

तर सुधीर कुमार सिंग त्यांचा मुलगा ओम कुमार आणि चालक अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट येथील सुधीर कुमार होळी सणानिमित्त जमुई येथील सासरच्या मंडळीकडे जात होते.

सोमवारी पहाटे त्यांची कार बछवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमटियाजवळ आली असता, अचानक कारचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच भरधाव वेगात असलेल्या कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली.

या घटनेत अर्चना देवी, नम्रता कुमारी आणि काजल कुमारी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन मोठा आक्रोश केला. ऐन होळीच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरातील नागरिक देखील हळहळ व्यक्त करीत होते.

Bihar Car Accident News
Ujjain Temple Fire: उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com