Woman Loses Four Limbs Saam TV
देश विदेश

Woman Loses Four Limbs: मासे खाणं महिलेच्या जीवावर बेतलं; शस्त्रक्रियेत दोन्ही हात अन् पाय कापले, नेमकं काय घडलं?

US woman loses hands legs: लिफोर्नियामधील एका ४० वर्षीय महिलेने कमी शिजलेले आणि खराब मासे खाल्याने मरणाच्या दारात जावं लागलंय.

Ruchika Jadhav

California News:

मासे खाणं अनेक व्यक्तींना आवडतं. मासे खाण्यासाठी मत्स्य प्रेमी महागडे मासेही खरेदी करतात. अनेक जण हॉटेलमध्ये देखील जाऊन महागडे मासे खरेदी करतात. मासे खाणाऱ्या व्यक्तींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅलिफोर्नियामधील एका ४० वर्षीय महिलेला कमी शिजलेले आणि खराब मासे खाल्याने मरणाच्या दारात जावं लागलंय. या महिलेला झालेल्या आजारात दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. (Latest Marathi News)

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. या महिलेने तिलापिया नावाचा मासा खरेदी केला होता. मासा घरी आणल्यावर तिने तो शिजवला आणि मस्त जेवण केलं. हा मासा फक्त महिलेनेच खाल्ला होता. मासा खाल्यानंतर महिलेची तब्येत बिघडू लागली. शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेचे प्राण वाचले आहेत. मात्र डॉक्टरांना महिलेचे दोन्ही हात पाय तोडावे लागलेत.

महिलेच्या शरीरात जिवाणूजन्य विषाणूचा संसर्ग झाला होता. मासे खाल्यानंतर तिच्या हाताची आणि पायाची बोटे काळी पडू लागली. खालचा ओठ देखील काळा पडला होता. तिला सतत ताप येत होता. तसेच किडनी देखील निकामी होण्याच्या मार्गावर होती. महिलेने आपला अनुभव सांगताना म्हटलं की, मला यावेळी श्वास देखील घेता येत नव्हता. मी ऑक्सिजनवर होते.

मासे खाल्यानंतर झालेल्या संसर्गाचा दरवर्षी १५० ते २०० व्यक्ती सामना करतात. या विषाणूचा प्रादुर्भाव फार जास्त आहे. यामध्ये विषाणूचा संसर्ग झाल्यावर व्यक्ती ३ ते ४ दिवस आजारी पडतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या व्यक्ती या रोगाने जास्त आजारी पडतात परिणामी अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT