वसईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत एका गायकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसाई पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील एका प्रवासी विश्रामगृहात ही धक्कादायक घटना घडडली आहे. या घटनेने विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील यात्री प्रवासी विश्रामगृहात थांबलेल्या गायकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
राधाकृष्ण व्यंकट रमण असं मृत गायकाचे नाव आहे. तर वाहनचालक राजू शहा यानेच गायक राधाकृष्ण यांची हत्या पोलीस तपासात समोर आले आहे. हे दोघेही लॉजिगमध्ये एकाच रुममध्ये राहत होते.
नेमकं काय घडलं?
मृत राधाकृष्ण व्यंकटरमण हे व्यवसायाने गायक आहे. ते आठवडाभरापूर्वी वसईच्या यात्री प्रवासी गृह या लॉजच्या एका खोलीत राहण्यासाठी थांबले होते. या लॉज मालकाने राजू शहा याला राधाकृष्ण यांच्या रुममध्ये राहण्यास सांगितले.
दोघे लॉजमध्ये एकाच खोलीत राहत असताना त्यांच्यात फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यावरून दोघांत जोरदार भांडण झाले. दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात राजू शहा याने गायक राधाकृष्ण यांची पोटात चाकू भोसकून हत्या केली.
माणिकपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली आहे.
पुण्यात पीएमपी चालकाची हत्या
पुण्यात मध्यरात्री पीएमपी चालकाचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जांभूळवाडी भागातील वादातून पीएमपी चालकाची हत्या करण्यात आली आहे. राजेंद्र दिवेकर असं हत्या झालेल्या चालकाचे नाव आहे. हत्या प्रकरणात दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक आहे.
अशोक कुंभार,रोहीत पाटेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही एकत्र दारू पीत असताना झालेल्या वादातून आरोपींनी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.