UNION CABINET EXPANSION SOON? RAMDAS ATHAWALE HINTS AT NCP LEADERS GETTING MINISTERIAL BERTHS saam tv
देश विदेश

Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळणार मंत्रिपद, बड्या नेत्याचं विधान

Union Cabinet Expansion : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याचे संकेत दिलेत. महाराष्ट्रातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मंत्रिपदासाठी समावेश होऊ शकतो, असे त्यांनी नागपुरातील कार्यक्रमात म्हटले.

Bharat Jadhav

  • केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार

  • भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याचे संकेत

  • शरद पवारांनी NDAमध्ये सहभागी व्हावे, असा सल्ला आठवले यांनी दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. ते आज नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांचा मंत्रिपदासाठी समावेश असेल. शरद पवार यांनी एनडीए (NDA) मध्ये सामील व्हावे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्या पक्षातील आठ खासदारांनी या एनडीएमध्ये सामील व्हावे, असा सल्लाही आठवले यांनी यावेळी दिला.

आठवलेंची काँग्रेसवर टीका

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, काँग्रेस पक्षाने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कधीही मुख्यमंत्री केले नाही. कदाचित, ते अनुसूचित जातीचे असल्यानेच काँग्रेसने त्यांना कधी मुख्यमंत्री केले नसावं. असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलताना आठवले म्हणाले की, हा विस्तार लवकरच होईल. यासाठी अनेक नावांचा विचार केला जाऊ शकतो. यात काही मंत्री भाजपचे, तर काही राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील.

शरद पवार गटातील आठ खासदारांनी एनडीएमध्ये यावं - आठवले

आठवले यांनी सांगितले की, शरद पवार यांचा पक्ष त्यांच्यासोबत सामील होईल की नाही याबद्दल कोणतीही निश्चित माहिती नसली तरी, शरद पवारांनी एनडीए (NDA) मध्ये सामील व्हायला हवे. त्यांनी म्हटले, "जर जॉर्ज फर्नांडिस सामील होऊ शकत होते, तर तुम्ही का नाही? देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं. त्यांच्याकडे ८ खासदार आहेत, त्यांनी आमच्यासोबत यावं. जर शरद पवार भाजपसोबत येऊ शकत नसतील तर त्यांच्या खासदारांनी एनडीएमध्ये सामील व्हावे.

दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आज (१७ ऑगस्ट) करण्यात आली. यात वसुंधरा राजे, राम माधव आणि स्मृती इराणी यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. संघटनेत अनेक माजी आणि विद्यमान नेत्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

45 दिवस रोज एक केळ खाल्लं तर शरीरात काय होतं? जाणून घ्या परिणाम

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन

Fasting Tips : श्रावणात उपवासाला कॉफी प्यावी की नाही? जाणून घ्या 'या' ६ टिप्स

Pune : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणांत ६.७५ टीएमसी पाण्याची आवक

सोसायट्यांसाठी मोठी बातमी! पार्किंग, EV चार्जिंगसाठी लागू होणार नवे नियम

SCROLL FOR NEXT