Viral Video| C-17 च्या चाकाजवळ आढळले मृतदेह Saam Tv
देश विदेश

Viral Video| C-17 च्या चाकाजवळ आढळले मृतदेह

अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर सुटकेसाठी मोठी गर्दी झाली होती. अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर Kabul Airport सुटकेसाठी मोठी गर्दी झाली होती. अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये प्रचंड भितीचं (Fear of Taliban) वातावरण आहे. काहीही करुन लोकांना तिथून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी लोकं वाटेल ते करत आहेत. विमानात जागा मिळत नसल्याने काही अफगाण नागरिकांनी C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या चाकाला (Wheel) लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून आले होते की, अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हे दोघेजण C-17 विमानाच्या चाकांना लटकलेली होते. विमामाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हे दोघेजण मोठ्या उंचीवरुन खाली पडले आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

सोमवारी काबूल विमानतळावर घडलेल्या या घटनेचा आढावा अमेरिकेचे विशेष तपास कार्यालय घेत आहे, असे अमेरिकन एअर फोर्सकडून सांगण्यात आले आहे. काही जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, सोमवारी अमेरिकन एअर फोर्सचे C-17 ग्लोबमास्टर विमान उड्डाणाच्या तयारीत होते आणि अफगाणि नागरिक या विमानासोबत धावत होते.तर काही नागरिक चाकाजवळच्या भागामध्ये बसलेले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अमेरिकन एअर फोर्स कडून या घटनेत नेमका किती जणांचा मृत्यू झाला हे सांगितलेले नाही. पण लँडिंग केल्यानंतर कतारच्या उदीद एअर बेसवर C-17 ग्लोबमास्टरने विमानाच्या चाकाजवळ काही मृतदेह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडीओ मोठया प्रमाणात सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील भयानक परिस्थितीची कल्पना पाहण्यात येत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT