DMK MLA Viral Video
DMK MLA Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: हौस पडली महागात! आमदारसाहेब चालवायला बसले अन् कार्यकर्त्यांसह बस थेट खड्ड्यात; VIDEO तुफान VIRAL

Gangappa Pujari

Tamilnadu Viral Video: लोकप्रतिनिधींना आपण केलेल्या कामाची चर्चा व्हावी असे वाटणे साहजिकच आहे. त्यासाठी हे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंबही करताना दिसत असतात. क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाला आल्यानंतर अनेकदा नेते मंडळींची फटकेबाजी पाहायला मिळते, तर कधी ही मंडळी कार्यकर्त्यांसोबत बसून पंगतीत ताव मारताना दिसतात. थोडक्यात कार्यकर्त्यांच्या गर्दीत आले की नेते मंडळीही आपल्या आवडीनिवडी जपताना पाहायला मिळतात.

सध्या अशाच एका आमदार साहेबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आमदारांना बस चालवण्याचं केलेलं धाडस भलतच महागात पडल्याचे दिसत आहे. (Viral Video)

हा सगळा प्रकार तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) घडला आहे. तामिळनाडूतील कांचीपुरम येथील डीएमकेचे (DMK) आमदार (MLA) सीव्हीएमपी एझिलारासन यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेता आला आहे. सीव्हीएमपी एझिलारासन यांनी बुधवारी त्यांच्या मतदारसंघातील एका नवीन बस मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी आमदारांनी सरकारी बसला हिरवी झेंडा दाखवला आणि त्यांनी चक्क बस चालवायला घेतली. आमदारांनी बस चालवण्यापूर्वी बसची पूजाही केली.

शिवाय आता चक्क आमदारसाहेब बस चालवणार म्हटल्यावर कार्यकर्ते मागे कसे राहतील? त्यामुळे आमदार बसमध्ये चढताच त्यांच्या पक्षाचे अनेक कार्यकर्तेही बसमध्ये चढले आणि आमदारांनी काही अंतरावर बस चालवत नेली. मात्र पुढे जावून असं काही घडलं की सगळ्यांचीच चांगलीच पळापळ झाली.

ही बस काही अंतरावर गेल्यानंतर आमदाराचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात गेली. बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस सर्वात आधी रस्त्याच्या कडेला लावलेल्या पक्षाचे झेंडे चिरडत जाते आणि त्यानंतर थेट एका खोल खड्ड्यात अडकते ज्यामुळे ती एका बाजूला कलंडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे बसच्या शेजारी एक विजेचा खांब असल्यामुळे उपस्थितांना तत्काळ द्रमुकचे कार्यकर्ते आणि बसमध्ये बसलेल्या इतर लोकांना बाहेर काढले.

बस खड्ड्यात गेल्यानंतर सर्वांचीच चांगलीच पळापळ झाल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. बस खड्ड्यात जाताच आमदारसाहेब बसमधून खाली उतरले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनाही उतरण्याचे आवाहन केले. नंतर अनेकांनी बसला ढकलून खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बस तेथून हटवण्यात आली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचं दिसत आहे. (Accident Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी आत्महत्या प्रकरण, हायकोर्टात याचिका

Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Mobile Hack: फोन पाण्यात पडला तर, चुकूनही करु नका हे काम,नाहीतर होईल नुकसान

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT