जम्मू- काश्मीरच्या डोडामध्ये बस अपघात, 10 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

जम्मू- काश्मीरच्या डोडामध्ये बस अपघात, 10 जणांचा मृत्यू

जम्मू- काश्मीर मधील डोडा या ठिकाणी भीषण अपघात झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीर मधील डोडा या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. थात्री- दोडा मार्गावर सुई गवारी या ठिकाणी गुरुवारी सकाळी हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बस थाथरीहून दोडाकडे जात होती. यावेळी सुई गवारी या ठिकाणी चालकाचे वाहनावर असलेले नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळली आहे.

हे देखील पहा-

जखमींना उपचाराकरिता जीएमसी दोडा या ठिकाणी नेण्यात आले आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच, पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आलेल्या ट्विटनुसार, पीएम मोदी म्हणाले आहे की- जम्मू आणि काश्मीर मधील डोडाच्या थाथरी जवळ झालेल्या रस्ते अपघातामुळे मी दु:खी झालो आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी कुटुंबियांना माझ्या संवेदना व्यक्त करत आहे.

जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करत आहे.' दरम्यान, PMOने अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. डोडाच्या अतिरिक्त एसपींनी दिलेल्या माहितीनुसार की, थाथरीहून डोडाकडे मिनी बस जात होती.

यादरम्यान चालकाचे बसवर असलेले नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झाले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आत्ताच डीसी डोडा विकास शर्मा यांच्याशी बोललो, जखमींना जीएमसी डोडा या ठिकाणी पाठवले जात आहे. योग्य ती सर्व मदत पुरवली जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

Abdul Sattar News : उद्धव ठाकरेंच्या मनावर परिणाम झालाय, अब्दुल सत्तार यांचा पलटवार

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

SCROLL FOR NEXT