Manasvi Choudhary
नाकावरचे ओपन पोअर्स कमी करण्यासाठी घरगुती काही टिप्सचा उपयोग करा.
एका कापड्यात बर्फ गुंडाळून नाकावर १-२ मिनिटे मसाज करा यामुळे ओपन पोअर्स आकुंचन पावतात.
मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते. १ चमचा मुलतानी मातीत थोडे गुलाब पाणी घालून नाकावर लावा
अंड्याचा पांढरा भाग नाकावर लावा आणि त्यावर टिश्यू पेपर ठेवा. वाळल्यावर तो हळूच काढून टाका.
टोमॅटोमध्ये नैसर्गिक 'ॲस्ट्रिंजंट' गुणधर्म असतात. टोमॅटोचा रस नाकावर लावून १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
अनेकदा त्वचा कोरडी पडल्यामुळे पोअर्स मोठे दिसतात. त्यामुळे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ऑईल-फ्री मॉइश्चरायझर नक्की लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.