Delhi Bus firee Saam
देश विदेश

Lucknow: अग्नितांडव! ८० प्रवाशांना घेऊन बस दिल्लीला निघाली, अचानक पेट घेतला, ५ जणांचा होरपळून मृत्यू

Lucknow Bus Inferno: 5 Killed: बिहारहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या बसने घेतला अचानक पेट, ५ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी, परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर, इतर गंभीर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बस बिहारहून दिल्लीला जात होती. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी ५ जणांना मृत घोषित केले.

ही धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी किसनपथावर घडली. ही बस बिहारहून दिल्लीच्या दिशेने जात होती. दरम्यान, शॉर्ट सक्रिटमुळे बसने अचानक पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला वेढले. आग लागताच चालक आणि कंडक्टर यांनी बसमधून उडी घेतली. तर, बसमधील ८० प्रवाशांनी बसच्या काचा फोडून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धावत्या बसने पेट घेतल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून ५ लोकांना मृत घोषित केले. ज्यात दोन मुलांसह पाच जण जिवंत जळाले.

या घटनेनंतर डीसीपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या घटनेच्या अधिक तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT