Uttarakhand Accident Saam tv
देश विदेश

Accident: २० प्रवाशांना घेऊन जाणारी बस अलकानंद नदीत कोसळली, पाहा थरारक VIDEO

Uttarakhand News : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात २० प्रवाशांना घेऊन जाणारी बस अलकानंद नदीत कोसळून मोठा अपघात घडला आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून १० जण अद्यापही बेपत्ता आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तराखंडमधील अलकानंद नदीत २० प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळल्याची घटना घडली. ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

उत्तराखंडमधील बद्रीनाथ घोलतीरजवळ गुरूवारी सकाळच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. २० प्रवाशांना घेऊन जाणारी बस अलकानंद नदीत कोसळली. बद्रीनाथ घोलतीरजवळ वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर आहेत. तसंच १० जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्यासाठी स्थानिक पोलिस तसेच एसडीआरफचे जवान पोहचले असून बचाव कार्य सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

बस अपघातामधील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच अनेक जण वाहून गेल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता झालेल्यांचा एनडीआरएफची टीम शोध घेत आहे. या अपघाताचा तपास उत्तराखंड पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनाप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत दुःख व्यक्त केले.

काय म्हणाले उत्तराखंडचे मुख्यमंत्री ?

अलकनंदा नदीत बस कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'रुद्रप्रयाग जिल्ह्यात एका टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. एसडीआरफ आणि इतर बचाव पथके युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करत आहेत. मी या घटनेबाबत स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. मी सर्वांच्या सुक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT