पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ सप्टेंबर) ओडिशामध्ये देशासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली. अनेक विकास प्रकल्पांसह त्यांनी बीएसएनएलचे तंत्रज्ञानावर आधारित 4G नेटवर्क लाँच केले आहे. या नेटवर्कच्या लाँचिंगनंतर आता भारतातील सर्व कानाकोपऱ्यातील भागांपर्यंत जलद इंटरनेट पोहोचू शकेल.
बीएसएनएलने देशभरातील ९८,००० साइट्सवर हे 4G नेटवर्क सुरु केल्याचे सांगितले आहे. या नेटवर्कची खासियत म्हणजे ते संपूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आले असून भविष्यात हे सहजपणे 5G मध्ये अपग्रेड करता येईल. यामुळे भारत आता टेलिकॉम उपकरणे तयार करणाऱ्या जगातील टॉप ५ देशांपैकी एक बनला आहे.
याचबरोबर, बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा प्रीपेड प्लॅनही सादर केला आहे. केवळ ₹२२५ रुपयांचा हा प्लॅन कमी किमतीत डेटा आणि कॉलिंगच्या योग्य संतुलनासाठी तयार करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज २.५ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. त्यानंतर इंटरनेटचा वेग ४० केबीपीएसपर्यंत कमी होतो. याशिवाय, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३० दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन विद्यार्थ्यांपासून मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
बीएसएनएलच्या विद्यमान योजनांमध्येही विविध किंमतींचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. २२९ रुपये आणि २२८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएससह १ महिन्याची वैधता मिळते. तर ₹१९९ च्या प्लॅनमध्ये तेच फायदे मिळतात, मात्र वैधता २८ दिवसांची आहे.
दीर्घकालीन ग्राहकांसाठीही बीएसएनएलने आकर्षक पॅक तयार केले आहेत. ₹२३९९ च्या वार्षिक प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो. ₹१९९९ च्या पॅकमध्ये ३३० दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. ₹९९७ च्या प्लॅनची वैधता १६० दिवस असून त्यात दिवसाला २ जीबी डेटा असतो, तर ₹५९९ च्या पॅकसोबत ग्राहकांना ८४ दिवसांची मुदत आणि दिवसाला ३ जीबी डेटा मिळतो. सर्वच प्लॅन्समध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.