देशाच्या एकतेसमोर नव्या राजकीय आव्हानाची चर्चा सुरू झाली आहे.
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडच्या स्वातंत्र्यसमर्थक नेत्यांनी संयुक्त करारावर स्वाक्षरी
या करारामुळे युनायटेड किंगडमच्या भविष्यातील घटनात्मक रचनेवर नवी राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता
ज्या ब्रिटेनने एकेकाळी भारताचे तुकडे केले होते, तोच ब्रिटन आता स्वतःच विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा आहे? ब्रिटेन हा देश तीन भागांत विभागला जाणार असून नेत्यांनी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केलीय. यामुळे ब्रिटेनची विभागणी होण्याचा धोका निर्माण झालाय. ब्रिटेनच्या तीन निम-स्वायत्त प्रदेशांमधील प्रमुख नेत्यांनी याबाबत घोषणा केली आहे. घटनात्मक बदलांसाठी ते सज्ज आहेत, कारण या प्रदेशांचे भवितव्य युरोपियन युनियनशी (EU) जोडलेले आहे. मंत्र्यांनी स्वाक्षरी केलेल्या ऐतिहासिक करारात ब्रिटिश संसदेला उद्देशून म्हटलंय की, 'वेस्टमिन्स्टर'चे युग संपले आहे.
कार्डिफ येथे झालेल्या एका परिषदेत स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर जॉन स्विनी, वेल्सचे त्यांचे समकक्ष रून ॲप आयोरवर्थ आणि उत्तर आयर्लंडच्या मिशेल ओ'नील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आयर्लंडमधील विरोधी पक्षनेत्या आणि 'सिन फेन'च्या (Sinn Féin) अध्यक्षा मेरी लू मॅकडोनाल्ड यांनीही या करारावर स्वाक्षरी केलीय. "आपल्या राष्ट्रांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. लोकशाहीला रोखण्याचा किंवा 'आपल्या लोकांचे भविष्य ते स्वतःच ठरवतील' या तत्त्वाला कमकुवत करण्याचा अधिकार वेस्टमिन्स्टरमधील कोणत्याही सरकारला नाहीये.
" मे महिन्यात झालेल्या सेनेड (वेल्श संसद) निवडणुकीत 'प्लाइड सिमरू' पक्षाला मिळालेल्या विजयामुळे वेल्श सरकारवरील लेबर पक्षाचे पूर्ण वर्चस्व संपुष्टात आले आहे. १९९९ मध्ये अधिकार हस्तांतरणाची (devolution) प्रक्रिया सुरू झाल्यापासून हे वर्चस्व कायम होते. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमधील नेत्यांनी म्हटले आहे की, या बेटांवरून आणि जगभरातून परिस्थिती पाहणाऱ्या लोकांसाठी, वेस्टमिन्स्टरच्या युगाचा अंत होतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एकत्रित आयर्लंड' पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सुमारे ४८ तासांनी या नेत्यांनी ही घोषणा केली. दरम्यान या कराराचे वर्णन फुटीरतावादी नेत्यांची शिखर परिषद, असे केले आहे.
वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड या तिन्ही प्रदेशांमधील नेते अशा पक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत, जे एकतर उत्तर आयर्लंडच्या एकत्रीकरणाचा किंवा स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, अशी स्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका शतकापूर्वी जेव्हा आयर्लंडला ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा उत्तर आयर्लंडची फाळणी झाली होती; तरीही, तो भाग ब्रिटेनचाच एक हिस्सा राहिलाय.
अँडी बर्नहॅम यांच्या प्रवक्त्याने दरम्यान ब्रिटेनच्या विभाजनचा धोका फेटाळून लावलाय.पंतप्रधानांचा युनायटेड किंगडमवर पूर्ण विश्वास आहे आणि ते घटनात्मक चर्चांमध्ये गुंतण्यापेक्षा राहणीमानाचा खर्च कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. दरम्यान, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या स्कॉटलंडविषयक 'शॅडो सेक्रेटरी' हॅरिएट क्रॉस यांनी या बैठकीचे वर्णन 'फुटीरतावादी परिषद' आणि फोटो सेशन म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.