PM Liz Truss Saam TV
देश विदेश

'मैदान सोडून पळणार नाही...', छातीठोकपणे सांगणाऱ्या ब्रिटनच्या PM Liz Truss यांचा 24 तासांतच राजीनामा

अवघ्या 45 दिवस त्यांनी ब्रिटनचं पंतप्रधान पद भूषवलं. लिज राजीनामा देणार याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लंडन : ब्रिटनमधील (Britain) राजकारणात मोठ्या घडामोडी सध्या सुरु आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनाना दिला आहे. सर्वात कमी कालावधी असलेल्या त्या पंतप्रधान ठरल्या आहेत. अवघ्या 45 दिवस त्यांनी ब्रिटनचं पंतप्रधान पद भूषवलं. लिज राजीनामा देणार याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.

राजीनामा दिल्यानंतर लिज ट्रस यांनी म्हटलं की, वर्तमान स्थिती पाहता मला वाटतं मी ज्यासाठी निवडणूक लढवली होती, ती आश्वासनं मी पूर्ण करु शकले नाही. मी ज्यावेळी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती बिकट होती, असं लिज यांनी म्हटलं आहे. (International News)

आम्ही कर कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते, मजबूत अर्थव्यवस्थेची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मला वाटते की सध्या मी ते करु शकले नाही. म्हणूनच मी राजीनामा देत आहे.

कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या 530 सदस्यांच्या YouGov सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की 55% सदस्यांचे मत आहे की लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा. लिझ ट्रस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे संकेतही इतर काही सर्वेक्षणातून देण्यात आले होते. त्यांच्या निर्णयावर त्यांचाच पक्ष नाराज होता. आता पुन्हा बोरिस जॉन्सन की ऋषी सुनक पंतप्रधान होणार अशी चर्चा आहे.

लिझ ट्रस यांनी पंतप्रधान असताना नुकतेच संसदेत मिनी बजेट सादर केले होते. या अर्थसंकल्पात त्यांनी करवाढ आणि महागाई रोखण्यासाठी पावले उचलली. मात्र लवकरच हे निर्णय सरकारने मागे घेतले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी करात कपात केली जाईल, असे मोठे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आपला निर्णय मागे घेतला, त्यामुळे पक्षातील अनेकजण नाराज झाले आणि राजीनाम्यासाठी ट्रस यांच्यावर दबाव वाढला.

आता लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ब्रिटनच्या राजकारणात पुढची पायरी काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. निवडणूक न घेता ती जबाबदारी दुसऱ्या प्रबळ दावेदाराकडे सोपवली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

SCROLL FOR NEXT