Crime Saam Tv News
देश विदेश

Crime News: नवरदेवाने लग्नाआधी दारू ढोसली, शुद्ध हरवली अन् वरमाला नवरीऐवजी....

Bride slaps groom at wedding: लग्नात वर दारू पिऊन आल्यामुळे आणि वराने दारूच्या नशेत वधूऐवजी मित्राला वरमाला घातल्यामुळे वधूने भर मांडवात वराच्या कानशिलात लगावली.

Bhagyashree Kamble

लग्नात वर दारू पिऊन आल्यामुळे आणि वराने दारूच्या नशेत वधूऐवजी मित्राला वरमाला घातल्यामुळे वधूने भर मांडवात वराच्या कानशिलात लगावली. त्यानंतर दोन्ही गटात राडा झाला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा वराच्या बाजूने हुंडा देखील मागितले असल्याचा आरोप वधूच्या कुटुंबाने केलाय.

नवरदेव लग्नाला आधी दारू पिऊन आला. नंतर वधू आली. नवरदेव मद्यधुंद अवस्थेत होता. वरमाला घालण्याच्यावेळी वधूने वराच्या गळ्यात वरमाला घातली. मात्र, वर मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याने वधूला वरमाला न घालता थेट मित्राच्या गळ्यात घातली होती. हे पाहून वधूला राग अनावर झाला. तिने सर्वांसमोर वराला कानाखाली मारली.

यानंतर लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूने वाद पेटला. दोन्ही गटात राडात झाला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. वराला आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात वराच्या बाजूने हुंडा देखील मागितल्याचा आरोप वधूच्या कुटुबांने केला.

हुंडा प्रकरणावरून पोलिसांनी तरूणावर हुंडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसेच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. वधूला समजण्याचा प्रयत्न वडील आणि नातेवाईकांनी केला. पण तिने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT