Bride Viral Video Saam TV
देश विदेश

Bride Viral Video : पती अन् प्रियकर दोघेही पाहिजेत; पोलीस ठाण्यात नववधूचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

महिलेने पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Ruchika Jadhav

Viral Video : उत्तरप्रदेशच्या हमीरपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात मोठा धिंगाणा घातला आहे. महिलेने केलेल्या गोंधळामुळे सर्व महिला कर्मचारी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ही महिला कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. सदर घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Bride Video)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला ही आधिच विवाहीत आहे. २२ फेब्रुवारी रोजी तिचे लग्न झाले. मात्र लग्नानंतरही ती आपल्या प्रियकरासोबत बोलत होती. या बाबत महिलेच्या पतीला देखील माहित होते. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना या बाबत तक्रार देण्यात आली. त्यामुळे महिलेने पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

ठरवल्याप्रमाणे महिलेने पतीला फोन कारून पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. यावेळी ही महिला हातात एक हार घेऊन वधूच्या पोशाखात आली होती. पोलीस ठाण्यात प्रवेश केल्यावर तिथे काही वेळाने महिलेचे कुटुंबीय देखील पोहचले.

आई वडील आणि पतीला पाहून ही महिला प्रचंड संतापली. आता काय करावे हे तिला सूचेना. तिला काही कारून प्रियकराशी लग्न करायचे होते. त्यामुळे महिलेने तिथेच धिंगाणा घालण्यास सुरूवात केली.

यावेळी सर्व महिला पोलीस कर्मचारी या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र महिला लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होती. तिला पतीसह प्रियकरासोबत देखील राहायचे होते. त्यामुळे ती एवढी हट्टाला पेटली की रागाच्याभरात तेथील एका पोलीस कर्मचारी महिलेचा फोन देखील ती जोरात खाली आपटते. बराच वेळ महिलेची समजूत काढल्यानंतर महिलेचे कुटुंबीय तिला घेऊन घरी जातत. सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT