MODI CABINET RESHUFFLE BUZZ INTENSIFIES AS NITIN NAVIN RETURNS TO DELHI AMID BJP POLITICAL SPECULATION Saam Tv
देश विदेश

Political News : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार , नितीन नवीन आणि राघव चड्ढा तातडीने दिल्लीला रवाना

BJP Modi Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंअचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे

  • भाजपचे नेते नितीन नवीन यांनी पंजाब दौरा अर्धवट सोडून दिल्ली गाठली

  • नियोजित कार्यक्रमात बदल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

  • राघव चड्ढा यांना महत्त्वाचं पद देण्याची शक्यता

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, या फेरबदलाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंजाब दौरा अर्धवट सोडून अचानक दिल्लीला परतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नवीन यांनी काही तासांपूर्वीच पंजाबमधील कार्यक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर ते पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची भेट घेण्यासाठी लुधियानाहून चंदीगडकडे जाणार होते. तसेच भाजप पंजाबचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांच्या घरी भेट देऊन मंगळवारी दिल्लीला जाण्याचं नियोजन होतं. मात्र, नियोजित दौऱ्यात बदल करत त्यांनी चंदीगडला न जाता थेट लुधियानातील हलवारा विमानतळावरून दिल्लीकडे वाटचाल केली आहे.

दिल्लीकडे जाण्यापूर्वी विमानतळावर त्यांनी राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि राज्यसभा खासदार विक्रमजीत साहनी उपस्थित होते. दरम्यान, राघव चड्ढा यांनी नुकतीच पंजाबमधील भाजपच्या एका कार्यक्रमात प्रथमच उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात ते नितीन नवीन यांच्यासोबत दिसून आल्याने त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ आणि भाजपमध्ये महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT