Uttar Pradesh Election Result News  AI Image
देश विदेश

Election Result : मोठी बातमी! भाजपची ताकद आणखी वाढली, ८ खासदारांची बिनविरोध निवड, पाहा यादी

Uttar Pradesh Election Result News : उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर! भाजपचे ८ आणि समाजवादी पक्षाचे २ उमेदवार बिनविरोध विजयी. विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी आणि अखिलेश यादव यांच्या भूमिकेबद्दल जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांपैकी आठ जागांवर भाजपची बाजी

  • समाजवादी पक्षाला दोन जागा

  • सर्व दहा उमेदवार बिनविरोध

  • दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) ८ जागांवर, तर समाजवादी पक्षाने (सपा) २ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर सर्व १० उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपच्या आठ आणि समाजवादी पक्षाच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. याशिवाय दोन अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले होते. मात्र, छाननीदरम्यान त्यांचे अपूर्ण अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आणि भाजपचे आठ, तर समाजवादी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

भाजपचे आठ उमेदवार राज्यसभेवर

भाजपकडून धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडेय, प्रियंका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रुती गंगवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. धर्मपाल सिंह हे योगी सरकारमधील मंत्री असून आंवला मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. राधाकांत ओझा हे वरिष्ठ वकील आहे. प्रकाश पाल यांनी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. विद्यासागर सोनकर हे भाजपचे अनुभवी नेते असून पूर्वांचलमधील दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. गोपी कृष्ण पांडेय हे पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. प्रियंका सिंह रावत या बाराबंकीच्या माजी खासदार असून दलित महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. राम प्रताप सिंह चौहान यांनी भाजपचे प्रदेश महामंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. श्रुती गंगवार या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या कन्या आहेत.

समाजवादी पक्षाचे दोन उमेदवार विजयी

समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ नेते प्रा. रामगोपाल यादव आणि धनराज परिमल नथवानी यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. रामगोपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका आहेत. पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. धनराज परिमल नथवानी यांचा उद्योग क्षेत्राशी संबंध असून त्यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

अखिलेश यादव यांची भूमिका चर्चेत

निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्ष तिसरा उमेदवार देणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, अखिलेश यादव यांनी 6 ऑक्टोबर रोजी ‘तीन नव्हे, तर 403 जागांचे लक्ष्य’ असल्याचे सांगत तिसरा उमेदवार न देण्याचे संकेत दिले. त्यामुळे मतांची जुळवाजुळव आणि संभाव्य राजकीय संघर्ष टळला.या निकालामुळे उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांवरील निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदे गटाच्या आमदाराला भाजपचा खणखणीत इशारा

Teeth Grinding in Sleeping: रात्री झोपेत दात किटकिटतात? वेळीच ओळखा 'ही' लक्षणं, जाणून घ्या उपाय

Accident: दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, अपघातामध्ये २ प्रसिद्ध व्यापाऱ्यांचा मृत्यू

Nashik : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरुवात! राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य धर्मध्वजारोहण सोहळा

Mumbai Fort : स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान! एकाच डोंगररांगेवर वसलंय दोन किल्ले, मुंबईजवळच आहे खास लोकेशन

SCROLL FOR NEXT