RBI Repo Rate  Saam Tv
देश विदेश

RBI Bomb Threat: मोठी बातमी! आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

RBI Bomb Threat: खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सूरज सावंत

RBI Bomb Threat Latest News:

आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालयासहित एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, 'खिलाफत इंडिया'ने आरबीआयच्या कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली आहे. खिलाफत इंडियाने इमेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इमेलमध्ये आरबीआयचे गवर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजता बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याची धमकी इमेलमध्ये दिली होती.

खिलाफत इंडियाच्या धमकीनंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांच्या शोधमोहिमेत सर्व ठिकाणी आक्षेपार्ह आढळून आला नाही. या धमकी प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धमकीत काय म्हटलं होतं?

सकाळी आरबीआयच्या ईमेल आयडीवर खिलाफत इंडियाने धमकी दिली. खिलाफत इंडियाकडून दुपारी दीड वाजता मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील, असी धमकी देण्यात आली होती. तसेच ईमेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या राजीनाम्याची तत्काळ मागणी केली.

तत्पूर्वी, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT