पाकिस्तानमध्ये पीटीआयच्या महिला नेत्याचे अपहरण
सनम जावेद यांची कार अडवत त्यांना दुसऱ्या कारमध्ये जबरदस्ती बसवून नेण्यात आले
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या एका महिला नेत्याचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले. महिला नेत्याची कार अडवली त्यानंतर तिला कारमधून बाहेर खेचत काढत दुसऱ्या कारमध्ये बसवलं आणि अपरहण करण्यात आले. सनम जावेद असं या महिला नेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास घडली. पेशावरच्या रेड झोन परिसरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर ५ जणांनी पीटीआय नेत्या सनम जावेद यांचे अपहरण केले. आरोपींनी सनम जावेद यांना जबरदस्ती कारमधून बाहेर खेचत काढले आणि दुसऱ्या कारमध्ये बसवून नेले. या प्रकरणी सनम जावेद यांच्या सहकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पेशावरमधील पूर्व छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापुर यांनी घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले. ही घटना म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर उल्लंघन असल्याचे पीटीआय पक्षाने म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे माहिती सचिव शेख वकास अक्रम यांनी दावा केला की, दोन कारने सनम जावेद यांची कार अडवली. त्यावेळी कारमध्ये सनम यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. त्यांना कारमधून बाहेर काढत जबरदस्ती दुसऱ्या कारमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. सनम जावेद यांची तात्काळ सुटका करा अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा घटनांच्या माध्यमातून पीटीआय नेते आणि कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.