Karnataka Factory Blast Latest News  Saam TV
देश विदेश

Karnataka Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू; अनेक जखमी

Karnataka News Today: कर्नाटकातील एका फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी (२८ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Karnataka Factory Blast Latest News

कर्नाटकातील एका फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी (२८ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्गीस (वय ६२), स्वामी (वय ६०) आणि चेतन (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कर्नाटकातील बेलतंगडी परिसरातील कुक्कडी गावात फटाक्यांचा कारखाना आहे. (Latest Marathi News)

रविवारी या कारखान्यात कामगार काम करीत होते. दरम्यान, अचानक कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की जवळपास ४ किलोमीटपर्यंत परिसर हादरला. स्फोटामुळे कारखान्याला भीषण आग लागली.

स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात आगीने संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

मात्र, या घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. नेमका हा स्फोट कशामुळे झाला? याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत घटनेचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JOB Tips : नवीन नोकरी जॉइनिंग करण्यापूर्वी 'ही' ५ कामे करा, नाहीतर डोक्याला हात लावण्याची येईल वेळ

आजपासून 'माथेरानची राणी' पावसाळी सुट्टीवर, ४ महिने मिनी ट्रेन घेणार विश्रांती; अमन लॉज-माथेरान शटल सेवा राहणार सुरू

Maharashtra News Live Update : भीमाशंकर मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले; भाविकांची मोठी गर्दी

एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; मृतकाच्या सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल, वाशिम हादरले

Black Coffee Benefit: ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होण्यास मदत होते का? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT